Bjp Mla Narendra Mehta sarkarnama
मुंबई

Narendra Mehta: आधी नरेंद्र मोदींच्या मित्राची जमीन, मग शेजारील महिलेच्या जमिनीवर ताबा? भाजप आमदार नरेंद्र मेहता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

BJP MLA Narendra Mehta faces a fresh land dispute in Mira Bhayandar: मिरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीशी संबंधित जमिनीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. महिलेने आरोप केले असून मेहता यांनी ते फेटाळले आहेत.

Hrishikesh Nalagune

BJP MLA Narendra Mehta faces a fresh land dispute in Mira Bhayandar: मिरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता आणखी एका जमीन प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आपल्या मालकीच्या जमिनीवर मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीने बेकायदा बांधकाम परवानगी घेतल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. नरेंद्र मेहता यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालमित्र असगर अली वोहरा यांची भाईंदर येथील जमीन मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीने हडपल्याची तक्रार त्यांनी मोदींकडे केली होती. त्यानंतर अचानक चक्रे फिरली आणि वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करीत असल्याचे मेहता यांनी जाहीर केले होते. आता पुन्हा एकदा मेहता यांच्या कंपनीशी संबंधित मिरा रोड येथील एका जमिनीचा वाद उद्भवला आहे.

सर्व्हे क्र. ५३५/२ ही जमीन एलिव्हेशन प्रोजेक्ट या आपल्या कंपनीच्या मालकीची असून, त्याची रीतसर खरेदी आपण केली आहे. मात्र आपल्या जमिनीच्या लगत असलेल्या सेव्हन इलेव्हन कंपनीच्या मालकीच्या जमिनीवर मिरा-भाईंदर महापालिकेकडून देण्यात आलेल्या बांधकाम परवानगीमध्ये आपल्या जमिनीचा सर्व्हे क्रमांकही नमूद करण्यात आल्याचा आरोप सोहन कंवर या महिलेने केला आहे.

आरोप फेटाळला

नरेंद्र मेहता यांनी मात्र हा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. महापालिकेने सेव्हन इलेव्हन कंपनीच्या मालकीच्या जागेसाठीच बांधकाम परवानगी दिली आहे. लगतच्या कंवर यांच्या जमिनीसह परिसरातील सर्वच जमिनीसाठी एकच लेआऊट नकाशा मंजूर आहे. त्यामुळे त्या जमिनींवरील विविध बांधकाम परवानग्यांमध्ये सर्वच सर्व्हे क्रमांकाचा उल्लेख केला जातो. त्यानुसार आपल्या कंपनीच्या बांधकाम परवानगीतही कंवर यांच्या जमिनीच्या सर्व्हे क्रमांकाचा केवळ संदर्भासाठी उल्लेख आला आहे. त्याव्यतिरिक्त त्यांच्या जमिनीचा आपल्या बांधकाम परवानगीशी कोणताही संबंध नाही, असा खुलासा मेहता यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT