Mumbai News : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांच्या बाजूला पतंप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बसले नव्हते का? . मग मी त्यांच्या शेजारी बसून गुन्हा केला काय, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना विचारला. (Narendra Modi, Amit Shah Didn't sit next to Mahebuba Mufti? : Uddhav Thackeray)
विरोधकांच्या ऐकीच्या पाटण्यातील बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महेबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसले होते. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि भाजप नेत्यांनी (BJP) ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या मेळाव्यात उत्तर दिले.
ते म्हणाले की, महेबुबा मुफ्तींच्या शेजारी बसलो म्हणून तुम्ही माझ्यावर बोंबलत असाल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्याशेजारी बसले नव्हते का. मी मुद्दामहून महेबुबा मुफ्ती यांच्या बाजूला बसलो होतो. परत एकदा सांगतो की मी मुद्दामहून बसलो. हे तुमच्या नेत्यांनी केलेलं आहे. त्यांनी केलं म्हणून मोठी लोकं ज्या मार्गानं गेली, त्या मार्गांनी जावं म्हणून आम्ही गेलो. तुम्हा या नेत्यांना मोठे मानता आणि त्या मार्गांनी आम्ही गेलो की आम्ही गुन्हेगार. तुमचे नेते त्या मार्गांनी गेले नाहीत काय. आम्ही जर गुन्हा केला असेल तर तुमचे नेतेही गुन्हेगार आहेत, हेही बोला. अगदी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनीही गुन्हा केलाय, अपराध केला आहे, मग उद्धव ठाकरे गुन्हेगार आहेत, हे बोला.
आज संपूर्ण देशात तुम्ही हुकूमशहा म्हणून उभे राहत आहात. सैतानाचं एक रुप आमच्या समोर असताना त्या सैतानाला आम्हाला पहिलं गाडावंच लागेल, खतम करावंच लागेल, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.
बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा चालवता?
उद्धव ठाकरेंविषयी मिंद्येंना किती आकस आहे. किती विष भरलं गेलं आहे. मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेली शिवसेनेची शाखा तोडली. मी जरा मुद्दामहून सांगितलं की ती शाखा कशी तोडतात, ते जरा बघा. त्या शाखेवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे, तरी वरून हातोडा मारत आहेत. असा एकतरी हातोडा भाजप नेत्याच्या फोटोवर अथवा कार्यालयावर मारण्याची हिम्मत मिंद्देंनी दाखवून द्यावी. बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा चालवता. महिला कार्यकर्त्यांवर हात उचलला, तर यापुढे हात ठेवायचा नाही, असे मी शिवसैनिकांना अगोदरच सांगितलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.