Solapur DCC Bank : माजी उपमुख्यमंत्री, तीन माजी मंत्री, १३ माजी आमदारांसह तीन विद्यमान आमदारांवर थकबाकीची जबाबदारी होणार निश्चित

नुकसानीची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी (सहकार कायदा कलम ८८ अन्वये) सहकार विभागाने निवृत्त अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
Solapur DCC Bank News
Solapur DCC Bank NewsSarkarnama

Solapur District Bank News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कर्जवाटप आणि कर्ज थकबाकीमुळे बॅंकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीस जबाबदार असलेले माजी संचालक, निवृत्त आणि विद्यमान अधिकारी व कर्मचारी यांना नोटीसा पाठविण्यात आलेल्या आहेत. यामध्ये एक माजी उपमुख्यमंत्री, तीन माजी मंत्री, १३ माजी आमदार आणि दोन विद्यमान आमदारांचा समोवश आहे. त्याबरेाबरच १८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अनेक मातब्बर पुढाऱ्यांना नोटीसा गेल्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (Appointment of inquiry officer in Solapur district bank arrears case)

सोलापूर (Solapur) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून (District Bank) असुरक्षित कर्जवाटप करणे, वाटप केलेल्या कर्जाची थकबाकी यामुळे बँकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी (सहकार कायदा कलम ८८ अन्वये) सहकार विभागाने निवृत्त अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी जिल्हा बँकेच्या कागदपत्रांची पडताळणी करून नुकसानीस जबाबदार असलेले माजी संचालक, निवृत्त व विद्यमान अधिकारी/कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. जिल्हा बँकेच्या वर्तुळातील जवळपास सर्वच बड्या व्यक्तींच्या हातात नोटीस पडली आहे.

Solapur DCC Bank News
Opposition Unity Meeting : पाटण्यातील विरोधकांच्या ऐकीच्या बैठकीने उद्धव ठाकरेंची केली कोंडी

या नोटीसवर म्हणणे सादर करण्यासाठी पहिली सुनावणी येत्या ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्यालयातील लोकनेते बाबुराव (अण्णा) पाटील सभागृहात होणार आहे. बँकेच्या तत्कालिन संचालक मंडळाने कर्जवाटप केलेल्या प्रकरणांचा डॉ. तोष्णीवाल यांनी अभ्यास केला आहे. प्रकरणनिहाय जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.

Solapur DCC Bank News
Baramati News : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजप नेत्यांची मांदियाळी; प्रदेशाध्यक्ष, मंत्र्यांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रम

या संस्थांच्या कर्जप्रकरणी पाठविल्या नोटिसा

डॉ. तोष्णीवाल यांनी शंकर सहकारी साखर कारखाना, सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना, स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना, प्रियदर्शनी सहकारी साखर कारखाना (तोंडार, ता. उदगिर, जि. लातूर), घृष्णेश्‍वर सहकारी साखर कारखाना (खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर), निनाईदेवी सहकारी साखर कारखाना (कोक्रूड, ता. वाळवा, जि. सांगली), संतनाथ सहकारी साखर कारखाना, संत दामाजी सहकारी साखर कारखाना, सिध्दनाथ शुगर, आदित्यराज शुगर, गोविंदपर्व ॲग्रो, ज्ञानेश्‍वर मोरे शुगर फॅक्टरी, आर्यन शुगर, शिवरत्न उद्योग, मंगळवेढा ड्रायफूडर रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट कार्पोरेशन, पंचरत्न कुक्कटपालन संघ, उत्तर सोलापूर तालुका खरेदी-विक्री संघ, शरद शेतकरी सहकारी सूतगिरणी या प्रकरणांबाबत नोटीसा पाठविण्यात आलेल्या आहेत.

Solapur DCC Bank News
Solapur Politic's : सोलापुरातील भाजप नेत्याच्या मुलीला BRS कडून लोकसभा उमेदवारीची ऑफर?

नुकसानीस जबाबदार धरलेले तत्कालिन संचालक

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार वि. गु. शिवदारे, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, माजी आमदार ब्रह्मदेव माने, माजी आमदार एस. एम. पाटील, माजी आमदार बाबूराव चाकोते, माजी आमदार चांगोजीराव देशमुख, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार बबनराव शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार धनाजीराव साठे, माजी आमदार निर्मला ठोकळ.

Solapur DCC Bank News
Opposition Unity Meeting : केजरीवाल-अब्दुला आमने सामने; 'आप'ने अध्यादेशाचा विषय काढताच, अब्दुलांनी काढले ३७० कलम

सोलापूरच्या माजी महापौर नलिनी चंदेले, संचालक बबनराव आवताडे, अरुण कापसे, सुनंदा बाबर, चंद्रकांत देशमुख, सुरेश हसापुरे, रश्‍मी बागल, राजशेखर शिवदारे, संजय कांबळे, भैरु वाघमारे, रामदास हक्के, वसंतराव पाटील, प्रदीप लाळे, सुभाष बहिर्जे, प्रतिभा काशिद, सुनील सातपुते, चांगदेव अभिवंत, भरतरीनाथ अभंग, विद्या बाबर, सुरेखा काटे, सुनीता बागल, रामचंद्र वाघमोडे, प्रकाशराव व्यंकटराव पाटील, नागनाथ मोरे, सूर्यकांत ठेंगील, सुजता आंत्रोळीकर.

कर्मचारी संचालक : धन्यकुमार पाटील, शिवाजी दास, राजेंद्र पवार, सुभाष भोसले, संभाजी शिनगारे, भाऊसाहेब मोरे, जिल्हा परिषद प्रतिनिधी : श्रीशैल वरनाळे, नारायण खंडागळे यांना जबाबदार धरण्यात आले आहे.

Solapur DCC Bank News
KCR In Solapur : केसीआर यांचे सोलापुरात स्वागत; पण असे पक्ष देशावर राज्य करू शकत नाहीत, सुशीलकुमार शिंदेंची गुगली

अधिकारी/कर्मचारी

किसन मोटे (सरव्यवस्थापक), के. आर. पाटील (विभाग प्रमुख), मधुकर येडगे, राजकुमार प्रचंडे, अशोक प्रभळकर, शंकर रासकर (गोडाऊन किपर), राजेंद्र गोटे व अनिल ताकभाते, आण्णासाहेब हुलगे, (शाखाधिकारी), मल्लिनाथ दुलंगे, रावसाहेब जाधव, माणिक हक्के (वरिष्ठ बँक निरिक्षक), अशोक भांडवलकर व बसवराज यमपल्ले, प्रल्हाद कोकरे, (जिल्हा उपनिबंधक), बाळासाहेब सरनाईक (प्रतिनिधी), विजय काळे (नाबार्ड), संजीव कोठाडिया (सीए)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com