Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
मुंबई

PM Narendra Modi News : मोदींचे मराठीतून टि्वट , म्हणाले, "मी मुंबईत असेन.."

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मुंबईत सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन आज (गुरुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. (Narendra Modi News update)

पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभही होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

निवडणुकांच्या दृष्टीने दौरा महत्वाचा

राज्यातील सत्तांतरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने मोदींचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (MMRDA) आणि अन्य काही संस्थांच्या नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. कर्नाटकातील विविध विकासकामांचे उद‌्घाटन करून मोदी मुंबईत येणार आहेत.

मोदी म्हणाले..

मुंबई दौऱ्यासंदर्भात स्वत: पंतप्रधान मोदी यांनी टि्वट करुन माहिती दिली आहे. "मी उद्या (गुरुवारी) मुंबईत असेन. ३८ हजार कोटी रुपयांचा खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल.” असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

आपली आतुरतेने वाट पाहत आहे

मुख्यमंत्री एकनााथ शिेदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचे टि्वट रिटि्वट केलं आहे. दोघांनीही त्याचे मुंबईत स्वागत केलं आहे. महाराष्ट्र आपली आतुरतेने वाट पाहत आहे, मा. पंतप्रधान महोदय! असं म्हटलं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काय आहे कार्यक्रम

मेट्रो मार्गिका २ अ आणि ७ चे लोकार्पण, मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या २० शाखांचे लोकार्पण, ७ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, मनपाच्या तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन, ४०० किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन आदी कार्यक्रम मोदींच्या हस्ते होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहेत.

श्रेयवादाची लढाई

यातील बहुतांश प्रकल्पांचे नियोजन शिवसेनेच्या काळात झाल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गट आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचे दिसते. आजच्या सामनाच्या अग्रलेखात मोदींच्या या दौऱ्यावर टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT