Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
मुंबई

Narendra Modi News : 'शिवतीर्थ'वरील सभेआधीच मोदींचा 'मास्टर स्ट्रोक'; विरोधकांच्या प्रचाराचा 'तो' मुद्दाच गुंडाळला?

Deepak Kulkarni

Narendra Modi News : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान येत्या 20 मे रोजी होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील एकट्या मुंबईतल्या सहा जागांचा समावेश आहे. पाचव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा उद्या (ता.18)थंडावत आहे. पण त्याआधीच महायुती आणि महाविकास आघाडीच्या हाय व्होल्टेज सभा होत आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवतीर्थावरील सभेआधीच मास्टरस्ट्रोक लगावला आहे. त्यांनी विरोधकांच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा असलेला मोदी सरकार पुन्हा सरकार सत्तेत आलं तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे बदलण्यात येईल. हा मुद्दाच गुंडाळण्याचा प्रयत्न केला आहे. (Narendra Modi Mumbai Sabha)

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान येत्या 20 मे रोजी होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील एकट्या मुंबईतल्या सहा जागांचा समावेश आहे. पाचव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा उद्या (ता.18) थंडावत आहे. या निवडणुकीत विरोधकांच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा हा नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार पुन्हा सरकार सत्तेत आलं तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे बदलण्यात येईल.

या मुद्द्यावरुन देशात इंडिया तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून मोदी सरकारविरोधात वातावरण तापवलं जात आहे. पंतप्रधान मोदींसह भाजपच्या नेतेमंडळींकडून या आरोपाला जशास तसं प्रत्युत्तर दिले जात आहे. पण आता मोदींनी मुंबईतील शिवाजी पार्कवरील सभेअगोदर मुंबईतील चैत्यभूमी येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करत विरोधकांच्या संविधान बदलण्याच्या मुद्द्यालाच गुंडाळण्याचं प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीकेची झोड उठवतानाच नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून उल्लेख केला आहे.

पण आता भाजप शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंची कोंडी करतानाच त्यांच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून हल्लाबोल केला जातो.मोदींनी महायुतीच्या सभेआधी मोदींनी सावरकरांच्या स्मारकाला भेट देऊन त्यांनी मुंबईत येऊन ठाकरेंना एकप्रकारे डिवचलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT