Swati Maliwal Case : मालीवाल जबरदस्तीने केजरीवालांच्या घरात घुसल्या! आतिशी यांच्या गंभीर आरोपांनी खळबळ

Arvind kejriwal News : केजरीवालांच्या घरी 13 मेला आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप मालीवाल यांनी कला आहे. त्यांना शुक्रवारी पहिल्यांदाच आपने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.
Atishi, Swati Maliwal
Atishi, Swati MaliwalSarkarnama

New Delhi News : आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal Case) यांनी केलेले सर्व आरोप पक्षाने फेटाळले आहे. उलट मालीवाल यांच्यावरच पक्षाने गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. मालीवाल या भाजपच्या षडयंत्रातील प्यादं असल्याची टीका पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी केला आहे. त्या जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसल्याचा आरोपही आतिशी यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.

आतिशी (Atishi) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरी पीए विभव कुमार याने मारहाण केल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे. त्यानंतर पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे विभव (Bibhav Kumar) यांच्यासह केजरीवालांच्याही अडचणी वाढल्या आहेत. (Latest Political News)

Atishi, Swati Maliwal
Swati Maliwal Love Story : भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात जुळले सूर अन्..! स्वाती मालीवाल-नवीन यांची प्रेमकहाणी

मालीवाल यांचा केजरीवालांच्या घरातील सुरक्षारक्षकांशी असभ्य भाषेत बोलतानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झाला आहे. त्यानंतर आतिशी यांनी मीडियाशी बोलताना गंभीर आरोप केले. ते म्हणाले, केजरीवालांना जामीन मिळाल्यापासून भाजप घाबरले आहे. त्यामुळे भाजपने हे षडयंत्र रचले. स्वाती मालीवाल यांना 13 मे रोजी सकाळी त्यांच्या घरी पाठवले. भाजपच्या षडयंत्रातील त्या एक प्यादं आहेत. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्र्यांना गंभीर आरोप करण्याचा मालीवाल यांचा उद्देश होता. मुख्यमंत्री त्यावेळी उपलब्ध नव्हते, त्यामुळे ते वाचले. मग त्यांनी विभव कुमार यांच्यावर आरोप केले. आपल्याला बेदम मारहाण झाल्याचे त्या सांगत आहेत. पण आजच्या व्हिडिओने सत्य समोर आले, असे गंभीर आरोप आतिशी यांनी केले आहेत.

स्वाती मालीवाल पोलिसांना घाबरवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्या विभव यांना धमकावत आहेत. त्यांच्याविषयी अपशब्द वापरत आहेत. त्यांचे आरोप निराधार आहेत. कोणत्याही पुर्वसुचनेशिवाय त्या केजरीवालांच्या घरी आल्या होत्या. त्यामुळे त्यांना गेटवरच थांबवण्यात आले होते. तिथेही पोलिसांनी धमकावले. त्यांना वेटिंग रुममध्ये बसवण्यात आले. तिथून त्या जबरदस्तीने ड्रॉईंग रुममध्ये आल्या आणि केजरीवालांना भेटण्याचा आग्रह धरू लागल्या, असे आतिशी यांनी सांगितले.

Atishi, Swati Maliwal
Swati Maliwal Case : केजरीवालांच्या घरातील व्हिडिओ व्हायरल; मालीवाल म्हणाल्या, राजकीय हिटमॅनने...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com