Maharashtra Political News : देशातील वाढती बेरोजगारीवरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी कायम मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट आरबीआयच्या रोजगारावरील अहवालाचा दाखला देत विरोधकांवर पलटवार केला.
गेल्या तीन वर्षांत देशामध्ये तब्बल 8 कोटी रोजगार उपलब्ध झाल्याचा दावा आरबीआयने केला आहे. त्यामुळे खोटे नरेटिव्ह पसरवणाऱ्यांची आता बोलती बंद झाल्याचा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला.
मुंबईतील तब्बल 29 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी देशात वाढत असलेल्या विकासासह रोजगारांबाबतही सुतोवाच केले. ते म्हणाले, कोरोनासारख्या महासंकटातही भारताने रोजगारांचे रोकॉर्ड केले आहेत. आरबीआयने राजगारावर रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार गेल्या तीन-चार वर्षांत 8 कोटी नवे रोजगार निर्मिती केल्याचे स्पष्ट केले आहे.
या आकड्यांनी रोजागारावर खोटे बोलणाऱ्यांचे बोलती बंद केली आहे, असा विरोधकांना मोदींनी टोला लगावला. हे खोटे बोलणारे गुंतवणुकीचे शत्रू आहेत. हे खोटे बोलणारे पायाभूत सुविधांचे दुश्मन आहेत. भारताच्या विकासाचे शत्रू आहेत. त्यांची प्रत्येक निती युवकांचा विश्वासघात करणारी आहे. तसेच रोजगार रोखणारी आहे. आता त्यांची पोलखोल होत आहे. आता भारताची जनता विरोधकांचे प्रत्येक खोटे नाकारत आहे, असा हल्लाबोल मोदींनी Narendra Modi नाव न घेत विरोधातील प्रमुख नेत्यांवर केला आहे.
देशातील विकासकामे होत असताना त्यातून कोणाला तरी रोजगार मिळतच असतो. देशात पायाभूत सुविधा वाढत आहेत. त्यामुळे रोजगारांच्या संधीही उपलब्ध होत आहेत. आता येणाऱ्या काळात नव्या गुंतवणुकीच्या माध्यामातून या रोजगाराच्या संधी आणखी वाढतील. एनडीए आणि महायुती सरकार रखडलेल्या प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर देत आहे, याकडेही मोदींनी लक्ष वेधले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.