Naresh Mhaske Sarkarnama
मुंबई

Naresh Mhaske : महिलांचा आदर असेल तर विधेयकाला पाठिंबा द्या, शिंदेंच्या खासदाराचे काँग्रेसला आवाहन

Naresh Mhaske Congress delimitation : राहुल गांधी काय बोलतात, यावर देशाचे धोरण ठरत नाही. विरोधाला विरोध करणे, एवढेच त्यांचे काम उरले आहे, असे म्हस्के म्हणाले.

राहुल क्षीरसागर

Naresh Mhaske News : एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे महिला आरक्षण विधेयकाला विरोध करायचा, हाच राहुल गांधी यांचा अजेंडा आहे. काँग्रेसला खरोखरच महिलांविषयी आदर असेल, तर त्यांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिले. तसेच येत्या ३० नोव्हेंबरला हे विधेयक संसदेत मांडण्यात येणार असून, ते मंजूर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाण्यात माध्यमांशी संवाद साधताना खासदार म्हस्के यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

महिलांना राजकीय क्षेत्रात योग्य प्रतिनिधित्व मिळावे, त्यांचा सन्मान वाढावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, मागील अधिवेशनात विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला. आता पुन्हा एकदा हे विधेयक संसदेत मांडण्यात येणार असून, देशातील प्रत्येक महिला या विधेयकाची प्रतीक्षा करीत असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. राहुल गांधी काय बोलतात, यावर देशाचे धोरण ठरत नाही. विरोधाला विरोध करणे, एवढेच त्यांचे काम उरले आहे. महिलांच्या सन्मानाबाबत काँग्रेसची भूमिका प्रामाणिक असेल, तर त्यांनी विधेयकाच्या बाजूने उभे राहावे, असेही म्हस्के म्हणाले.

राष्ट्रवादीच्या भूमिकेचे स्वागत

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घेतलेल्या भूमिकेचे म्हस्के यांनी स्वागत केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) भूमिकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सहमती दर्शविली आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि आव्हाड यांचे आभार मानतो, असे म्हस्के यांनी सांगितले.

आव्हाड यांचे मत वैयक्तिक

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला नताशा आव्हाड यांनी दर्शविलेल्या विरोधावरही म्हस्के यांनी भाष्य केले. नताशा यांनी त्यांचे वैयक्तिक मत मांडले आहे. त्या तरुण असून, त्यांना स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, शरद पवार यांची जी भूमिका आहे, तीच आपली भूमिका असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नताशा यांच्या वक्तव्यावर टीका-टिप्पणी करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हस्के यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT