Congress Vs NCP SP : काँग्रेसकडून पवारांच्या राष्ट्रवादीवर गद्दारीचा आरोप; डिलिमिटेशनच्या समर्थनाचा घेतला खरपूस समाचार

Praniti Shinde Statement : खासदार प्रणिती शिंदे यांनी डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर टीका केली. समर्थनार्थ मतदान केल्यास ती काँग्रेसशी नव्हे, तर देशाशी आणि संविधानाशी गद्दारी असल्याचे त्या म्हणाल्या.
Praniti Shinde-Sharad Pawar-Supriya Sule
Praniti Shinde-Sharad Pawar-Supriya SuleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 28 November : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला काँग्रेसने नेहमीच साथ दिली आहे. मग त्यात शरद पवार यांची राज्यसभा असो किंवा इतर गोष्टींबाबत. आज जर ते डिलिमिटेशनच्या समर्थनात मतदान करत असतील तर ती काँग्रेसशी नाही तर देशाशी आणि संविधानाशी गद्दारी करत आहेत, अशा शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली.

खासदार शिंदे म्हणाल्या, संविधानाच्या विरोधात जाऊन तुम्ही स्टॅन्ड घेत असाल तर तुमची एवढी मजबुरी काय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष देशाशी गद्दारी करत आहे आणि संविधानाशी गद्दारी करत आहे. ज्या लोकांनी त्यांना पुरोगामी विचारांचे म्हणून मतदान केलं, आज तुम्ही त्या लोकांच्या आणि विचारसरणीच्या विरोधात जाताय.

माझ्या संपर्कात काही राष्ट्रवादीचे खासदार आहेत. पण, त्यांच्या पार्टीचा स्टॅन्ड आहे, त्याच्या विरोधात जाण्याची त्यांनी हिम्मत ठेवावी, असे आवाहनही प्रणिती शिंदे यांनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांना केले.

रोहित पवार यांच्या भूमिकेबाबत त्या म्हणाल्या, वैयक्तिक त्यांच्या घरातील जे राजकारण असेल त्यावर मला बोलायचं नाही. असे सांगून प्रणिती शिंदे यांनी रोहित पवारांच्या काँग्रेस प्रवेशावर बोलणे टाळले.

तुमच्या माध्यमातून मला DMK पक्षाला आणि जे कोणी पक्ष डिलिमिटेशनला समर्थन करण्याच्या प्रयत्नात आहेत. तुम्ही पुन्हा विचार करा. तुम्ही लोकांच्या विरोधात आहात, भाजप तुमचा वापर करत आहेत, असेही त्यांनी म्हटले.

Praniti Shinde-Sharad Pawar-Supriya Sule
DMK Support Delimitation : मोठी बातमी! डीएमकेचा डिलिमीटेशन विधेयकाला पाठींबा जाहीर, एम के स्टॅलिन यांनी स्पष्टच सांगितले,...

त्या म्हणाल्या, कायमस्वरूपी सत्तेत राहण्यासाठी भाजप कटकरस्थाने करत आहे, याचे परिणाम या देशाला भोगावे लागणार आहेत. त्याचा परिणाम असा होईल की काही राज्यांना प्राधान्य दिले जाईल, आणि जी दक्षिणेची छोटे राज्य आहेत, त्यांना प्राधान्य दिले जाणार नाही. म्हणून राज्य वेगळी होण्याच्या संभावना आहेत. काही राज्यांना फंड्स मिळतील आणि कांही राज्यांना फंड्‌स दिले जाणार नाहीत; म्हणून देशाचे तुकडे होण्याची संभावना आहे. अनेक राज्य फ्रीडम घेऊन वेगळं होण्याची मागणी करतील आणि हे डिलिमिटेशनमुळे होण्याची संभावना आहे.

Praniti Shinde-Sharad Pawar-Supriya Sule
Delimitation Bill 2026 : डिलिमिटेशन विधेयकासाठी भाजपनं बहुमताचं गणित जुळवलं? पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली फोडाफोडीची रणनीती

ही तर मोठी शोकांतिका

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भाषणे मी खूप ऐकलेली आहेत. विधानसभेत संविधानाला धरून चालणारी त्यांची विचारसरणी आहे. आज जर दबावामुळे भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय ते जाहीर करत असतील तर ही मोठी शोकांतिका आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.