Sharad Pawar - Narhari Zirwal
Sharad Pawar - Narhari Zirwal Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Retirement News: नरहरी झिरवळांची पवारांना भावनिक साद; म्हणाले,''आमचं काही चुकलं असेल तर...''

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ‘लोक माझे सांगाती’या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपदावरुन पायउतार होत असल्याची घोषणा केली आहे. मात्र, यामुळे उपस्थित कार्यकर्ते आणि नेतेमंडळी भावनिक झाली. यावेळी सभागृहात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. शरद पवार जोपर्यंत निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत आम्ही सभागृह सोडणार नाही अशी भूमिका घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच भावुक झाले. जयंत पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना अश्रू अनावर झाले. तसेच प्रत्येकानं पवारांच्या भूमिकेवर आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. यावेळी नरहरी झिरवळ (Narhari Jhirwal) यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं.

नरहरी झिरवळ म्हणाले, तु्म्ही आत्ता जो निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानंतर अगदी गाव, तालुक्यातून फोन यायला सुरुवात झाली आहे. आपण तु्म्ही आत्ता जो निर्णय जाहीर केला आहे. पण तुमच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर त्याचा परिणाम आजपासूनच तळागळापर्यंत होणार आहे. त्यामुळे आमचं काही चुकलं असेल तर माफ करा. पण हा घेतलेला राजीनामा, निवृत्तीचा निर्णय मागे घ्या असंही झिरवळ यावेळी म्हणाले.

पवार यांनी आदिवासी भागात कोणताही पक्षभेद न पाहता मोठं काम केलं आहे. ती सर्व लोकं पवारांना देव मानतात. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पवारांनी त्यांचा राजीनामा मागे घेण्याची विनंती करण्यासाठी येणार आहेत. पण पवारांच्या निर्णयाचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याचंही झिरवळ यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे,विरोधी पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनचा सोहळा पार पडला. या पुस्तकात शरद पवारांच्या 2015 ते डिसेंबर 2022 पर्यंतच्या राजकीय घडामोडींच्या प्रवासाबद्दल भाष्य केले आहे. यावेळी शरद पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पवार काय म्हणाले?

अध्यक्षपदावरून निवृत्त झालो असलो तरी सार्वजनिक कार्यातून निवृत्ती नाही. साठ दशकांहून अधिक काळ जनमानसांत काम करत आलोय आणि त्या सेवेत कोणताही खंड पडणार नाही. सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी कुठेही असेन तिथे तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे उपलब्ध असेन. त्यामुळे भेटत राहू असंही शरद पवार म्हणाले.

जयंत पाटील काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही यावेळी अश्रू अनावर झाले. यावेळी जयंत पाटील म्हणाले, “आम्ही शरद पवारांच्या नावाने मतं मागतो, आज शरद पवारच बाजुला गेले तर आम्ही लोकांसमोर कुणाच्या नावानं जायचं, हा आमचा पहिला प्रश्न आहे. शरद पवारांनी अजूनही अध्यक्षपदावर राहणं, महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशाच्या राजकारणासाठी गरजेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्या नावानेच ओळखला जातो. शरद पवारांनी असं अचानक बाजुला जाण्याचा हक्क त्यांनाही नाही.”

आमच्या सगळ्यांचे राजीनामे घ्या...

देशाच्या सर्वोच्च ठिकाणी तुमची जी प्रतिमा आहे, ती दुसऱ्या कुणालाही जमणार नाही. तुम्ही आमच्या सगळ्यांची राजीनामे घ्या. तुम्हाला पक्ष कोणत्या नव्या लोकांच्या हातात द्यायचाय तो द्या. पण तुम्ही पक्षाच्या प्रमुख पदावरून बाजुला जाणं, हे कोणाच्याच हिताचं नाही. आम्हाला तुमच्या छायेखाली काम करायची सवय लागली आहे. तुम्ही बाजुला गेलात तर आम्ही कुणीच काम करू शकणार नाही. तुम्ही थांबणार असाल तर आम्ही सगळे थांबतो. हा पक्ष ज्यांना चालवायचाय त्यांना चालवू द्या,” असं भावनिक आवाहन जयंत पाटील यांनी केलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT