Dilip Walse-Patil on Sharad Pawar: देशाला, राज्याला तुमची गरज आहे; वळसे-पाटलांचीही पवारांना गळ

Sharad Pawar Announced Retirement : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन सभारंभात त्यांनी ही घोषणा केली आहे
Dilip Walse-Patil on Sharad Pawar
Dilip Walse-Patil on Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Dilip Walse-Patil News : आपण गोरगरिबांसाठी समाजासाठी जो आधार उभा केला. त्यात राजकारण न करता सगळ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी काळजी घेतली. आज राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांना एकत्र करण्याची गरज आहे. तुमची देशाला राज्याला गरज आहे. आपण हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच राज्यसभेची ही टर्म संपली की आपण या पुढे निवडणूक लढणार नाही.अशीही घोषणा त्यांनी केली आहे. 

Dilip Walse-Patil on Sharad Pawar
Sharad Pawar Retirement: शरद पवार यांच्या पदावरुन पायउतार होण्याच्या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर...

काय म्हणाले शरद पवार ?

मला विद्यार्थी चळवळीत आधिक रस होता. नववीत असताना पहिला मोर्चा काढला. १९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. त्यानंतर सतत मी विविध पदांवर आहे. म्हणजेच गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत असल्याचे पवार यांनी सांगितले. (Sharad Pawar Latest News)

पण कुठे थांबावं हे मला कळतं. मी निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रवादीची एक समिती नेमावी. प्रपुल्ल पटेल, सुनील तटकरे ., छगन भुजबळ, दिलीप वळसेपाटली, धनंजय मुंडे, राजेश टोपे, . असतील, पक्षात कोणाला कोणतं काम करावं, कोणाला कोणतं पद द्यावं हे ठरवतील. असंही त्यांनी यावेळी म्हटलं. तसेच मी त्यानंतरही जनतेच्या सेवेत कायम राहिल. असही त्यांनी यावेळी नमुद केलं. यावेळी बोलताना शरद पवार यांनी ही घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी, चाहत्यांनी त्यांच्या राजीनाम्याला प्रचंड विरोध केला. 

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com