Maharashtra Political News : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यावरून विरोधकांसह महायुतीतील काही नेत्यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे महायुती सरकार अडचणीत आले आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच या प्रकरणावर भाष्य केले आहे.
मुंबईत मीडियाशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी झिरवाळ प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. झिरवाळ यांनी आपल्याला फोन केला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, नरहरी झिरवाळ यांनी मला फोनवर संपर्क करून असं सांगितलं आहे की, हा व्हिडीओ तीन-चार व्हिडीओ एकत्रित करून चुकीच्या पध्दतीने तयार केलेला आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे. मी त्यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी तात्काळ यासंदर्भात एक तक्रार करावी.
व्हिडीओची शहानिशा करण्यात येईल. सत्यता पडताळून त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि आम्ही योग्य निर्णय करू, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. मंत्रालयातील लाच प्रकरणाच्या अनुषंगाने बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मागच्या काळात जी घटना घडली, त्याची पूर्ण चौकशी झाली. त्याचा कुठलाही संबंध झिरवाळांपर्यंत गेला नाही.
आताच्या व्हिडीओची सत्यता पडताळली जाईल. त्यामध्ये सत्य आढळले तर योग्य ती कारवाई होईलच, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट करणाऱ्या, लिंक व्हायरल करणारे आणि त्यावर कमेंट करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.
पेट्रोल-डिझेलची राज्याती टंचाई नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. लोकांनी घाबरून जाऊन जास्तीचे इंधन भरून कृत्रिम टंचाई निर्माण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. शंभर दिवस पुरेल एवढे इंधन असून कुठेही टंचाई नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी सध्याच्या स्थितीवर चर्चा करणार आहेत. इराण युध्दाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच अशी बैठक होत असल्याने संपूर्ण देशाचे त्याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.