

West Asia conflict india response : पश्चिम आशियातील युध्दाच्या परिस्थितीचा मोठा फटका भारताला बसू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या निवेदनामध्ये पुढील काळात देशाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, असे संकेत दिले होती. केंद्र सरकारकडून देशात एलपीजी व इंधनाचा तुटवडा नसल्याचे वारंवार सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे युध्दपातळीवर विविध उपाययोजना केल्या जात असल्याने पुढील काळात ऊर्जा संकट उभे ठाकणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
संसदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी कोरोना काळातील एकजुटी आठवण करून देत सध्याच्या स्थितीत यापुढेही टीम इंडिया म्हणून काम करण्याचे आवाहन सर्व राज्यांना केले होते. त्यानंतर आज त्यांच्याकडून देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांना निरोप धाडण्यात आला आहे. शुक्रवारी सर्वांची बैठक बोलाविण्यात आली आहे.
अमेरिका-इस्त्रायलकडून इराणवर हल्ला सुरू केल्यानंतर पहिल्यांदाच सरकारने मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नेमके कोणते मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार, आगामी काळात कोणते महत्वाचे निर्णय घेतले जाणार का याबाबत उत्सुकता वाढली आहे. या बैठकीला सध्या विधानसभा निवडणूक असलेल्या राज्यांतील मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत.
मागील काही दिवसांपासून इराण युध्दाच्या पार्श्वभूमीवर देशात वेगवान घडामोडी घडत आहेत. एलपीजीचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पीएनजीचा वापर वाढविण्यासाठी आवाहन केले जात आहे. रॉकेलची उपलब्धता वाढविण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी एकजुट राहण्याचे आवाहन संसदेत केले आहे. केंद्र सरकारने बुधवारीच विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेत त्यांना युध्दाच्या स्थितीची माहिती दिली होती. आता शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असलेल्या या घडामोडी देशापुढील आव्हानांचे संकेत देत आहेत. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामुळे युध्द असेच सुरू राहिले तर भारतासह संपूर्ण देशासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची भीती व्यक्त केली होती. देशात सध्या भरपूर इंधन साठा असल्याचे सांगत त्यांनी देशवासियांना दिलासाही दिला. इंधन, गॅस मिळविण्यासाठी उपलब्ध सर्व स्त्रोतांचा उपयोग केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.