Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Breaking News : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आमच्याबरोबरच ! अजित पवारांनी पुन्हा एकदा ठोकला दावा

Maharashtra NCP Political Crisis : '' नऊ आमदारांवर अपात्रतेच्या कारावाईची नोटीस ही बेकायदेशीर...''

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : एकीकडे शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बडतर्फ करण्यात आल्याची घोषणा केली आहे.पवारांच्या ट्विटनंतर काही क्षणातच अजित पवार यांच्या गटाने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर करतानाच कार्यकारणीची घोषणा केली आहे.आता अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं आहे. याचवेळी अजित पवार यांनी देखील मोठा दावा करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ हे चिन्ह आमच्याबरोबरच असल्याचा पुन्हा एकदा दावा ठोकला आहे.

अजित पवार(Ajit Pawar) यांनी सोमवारी( दि. ३) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, नऊ आमदारांवर अपात्रतेच्या कारावाईची नोटीस ही बेकायदेशीर आहे. एकाच नेत्याला प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदी राहता येत नाही असंही पवार यावेळी म्हणा्ले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

विरोधी पक्षनेतेपदाची निवड विधानसभा अध्यक्ष करतात. आम्ही राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात आहोत. आणि संभ्रम निर्माण होण्यासाठीच या नियुक्त्या करण्यात येत आहेत. कालपासून ज्या काही नोटिसा आमच्या सदस्यांना काढल्या आहेत असा कोणताही अधिकार त्यांना नाही.

अजितदादा नेमकं काय म्हणाले..?

अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष आणि पक्षचिन्ह आमच्यासोबत आहे. त्यामुळे नोटीस काढण्याचा अधिकार कोणाला नाही. आमच्या नऊ जणांना ते नोटीस काढू शकत नाही. आताच प्रफुल्ल पटेल यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची नियुक्ती केली आहे. त्यांना सर्वच अधिकार असणार आहे. नोटीस काढण्याचा प्रकार म्हणजे आमच्या आमदारांना घाबरवण्याचा प्रकार आहे. परंतु सर्वच आमदार आमच्यासोबत आहे असा दावाही अजित पवार यांनी यावेळी केला आहे.

प्रफुल्ल पटेल यांची मोठी घोषणा....

प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे(Sunil Tatkare) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच त्यांनी विधीमंडळाच्या गटनेतेपदी अजित पवार तर प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये युवक प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण तर महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अजित पवार यांच्याकडून संघटनात्मक बदल सुरु केले आहेत. संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त कऱण्यात येत आहे. सुनील तटकरे नवीन प्रदेशाध्यक्ष असतील. पक्षाच्या पुढील नियुक्तीचे संपूर्ण अधिकार सुनील तटकरे यांच्याकडे राहतील असेही प्रफुल पटेल म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT