Prafulla Patel on Jayant Patil राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करत असल्याचे जाहीर केलं आहे. त्यांच्या जागी अजित पवार यांच्याकडून सुनील तटकरे यांची नव्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचंही जाहीर केलं आहे. (Maharashtra Politics)
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजित पवारांची विधीममंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संघटनात्मक बदल सुरु केले आहेत. त्यानुसार जयंत पाटील (Jayant Patil)
यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करण्यात येत असून त्यांनी हस्तांतरणाची सुरुवात करावी. यापुढे सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील. पक्षाच्या पुढील नियुक्तीचे संपूर्ण अधिकार सुनील तटकरे यांच्याकडे राहतील. तसेच अनिल पाटील हेच प्रतोदपदी राहतील.
'' राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षाने मला अधिकृतरित्या कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. त्याआधी सप्टेंबर २०२२ मध्ये दिल्लीत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात माझी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आम्ही 'जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. संघटनात्मक निवडणूक न घेता त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती. पण आता आम्ही आता जयंत पाटील यांना या जबाबदारीतून मुक्त करत आहोत. त्यांच्याऐवजी सुनिल तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहोत.'' (NCP Political Crisis)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.