Sandeep Naik Sarkarnama
मुंबई

Sandeep Naik : नवी मुंबईतील नाईक परिवारात फूट? तर भाजपला खिंडार; संदीप नाईक याचं 'तुतारी' घेण्याचं ठरलं

Sandeep Naik from Navi Mumbai will leave BJP and join NCP SharadChandra Pawar party : संदीप नाईक यांनी भाजपची साथ सोडून देत शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याने नवी मुंबईत महायुतीमधील भाजपला धक्का बसला आहे.

Pradeep Pendhare

Assembly Election 2024 : नवी मुंबईतील नाईक कुटुंबात फूट पडली आहे. भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा 'तुतारी' उचलण्याचा निर्णय झाला आहे.

नाराज झालेले संदीप नाईक उद्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. संदीप नाईक यांच्या या भूमिकेमुळे भाजपला जोरदार धक्का बसला आहे. यावर गणेश नाईक यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.

"पक्षाच्या शिस्तीत, चौकटीत राहावं, असं मी संदीपला सांगितलं आहे. तुम्ही भूमिका मांडू शकता. अर्ज भरू शकता. परंतु दुराग्रह करण्याची मोकळीक नाही. मी त्यांना सांगितलं आहे. त्यांचा निर्णय घेण्यासाठी ते मोकळे आहेत. परंतु आपण त्यांच्या प्रचाराला जाणार नाही", असे गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी म्हटलं आहे.

भाजपने (BJP) काल पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत नवी मुंबईतील तिढा सुटेल असे वाटत असताना, तो वाढला. गणेश नाईक यांनी लोकसभा निवडणुकीवेळी भाजपकडे दोन विधानसभा मतदारसंघाची मागणी केली होती. यात बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता. गणेश नाईक यांनी तशी भाजपमधील बडे नेते अमित शाह यांच्याकडे 'फिल्डिंग' देखील लावली होती.

पवारांच्या पक्षात संदीप यांचा उद्या प्रवेश

बेलापूर विधानसभा मतदार संघातून संदीप नाईक भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु पहिल्या यादीत आमदार मंदा म्हात्रे यांचे नाव जाहीर झाले. तेव्हापासून नाराज असलेले संदीप नाईक यांनी शरद पवार यांची भेट घेत, तुतारी हातात घेऊन बेलापूर मतदार संघातून निवडूक लढण्याचा निर्णय घेतला. संदीप नाईक उद्या शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

पवारांच्या भेटीतील मुद्दे गुलदस्त्यात...

संदीप नाईक यांनी रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार यांनी या भेटीत कोणताही निर्णय दिला नव्हता, असे सांगितले जाते. पण भेटीत काही तरी निर्णय झाला, आणि त्याचा मोठा परिणाम होणार असे संकेत दिले मिळत होते. या भेटीतील मुद्यावर कोणतीही वाच्यता न करता संदीप नाईक यांनी 'वेट अॅण्ड वॉच', अशी भूमिका घेतली आणि आज संदीप नाईक हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची बातमी धडकली. या वृत्तानुसार शरद पवार यांनी संदीप नाईक यांनी ग्रीन सिग्नल दिल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT