मोठी बातमी! अजितदादांचा पहिला उमेदवार जाहीर, काँग्रेसमधून आलेल्या नेत्याला दिलं तिकीट

Assembly Election 2024 : महायुतीत भाजपनं पहिली यादी जाहीर केली होती. यातच अजितदादांनी पहिला उमेदवार जाहीर केला आहे.
ajit pawar (8).jpg
ajit pawar (8).jpgsarkarnama
Published on
Updated on

महायुतीत भाजपनं 90 उमेदवार जाहीर करत बाजी मारली होती. यानंतर आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पहिला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसमधून आलेल्या आमदाराला अजितदादांनी तिकीट दिलं आहे. ‘क्रॉस व्होटिंग’ प्रकरणात काँग्रेसनं या आमदाराचं पक्षातून निलंबन केलं होतं. त्यानंतर आमदारानं अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यातच आता अजितदादांनी पहिला अधिकृत उमेदवार जाहीर करत तिकीट दिलं आहे.

काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर ( Hiraman Khoskar ) यांनी ऑक्टोबरला अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हिरामण खोसकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यासह खोसकर यांना अजितदादांनी ‘एबी’ फॉर्मही दिला आहे.

खोसकरांवर काय आरोप?

हिरामण खोसकर हे 2019 मध्ये काँग्रेसकडून इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत ‘क्रॉस व्होटिंग’ केल्याचा आरोप खोसकर यांच्यासह 7 आमदारांवर करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर खोसकर यांना 6 वर्षे पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर खोसकर यांनी 14 ऑक्टोबरला अजितदादांच्या  ( Ajit Pawar ) राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

ajit pawar (8).jpg
Ajit Pawar : अजितदादांचा ठाकरेंना मोठा धक्का; पुण्याच्या जिल्हाप्रमुखांनाच फोडले

विजय आमचा होणार

हिरामण खोसकर म्हणाले, “काँग्रेसकडे आम्ही दोन महिने जात होतो. मात्र, त्यांनी ऐकलं नाही. आमची फसवणूक होईल, असं वाटल्यानं आम्ही राष्ट्रवादीत आलो. ‘एबी’ फॉर्म घेण्यासाठी आमची 500 लोक आली आहेत. मग निवडणूक कशी होईल ते बघा. मी राष्ट्रवादीत शिपाई म्हणून काम करणार आहे. विरोधकांनी यादी अजून आली नाही. मात्र, विजय आमचा होणार आहे.”

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com