navi-mumbai-mayor-election-rupali-kismat-bhagat-stay-order-belapur-court-bjp-shiv-sena-dispute Sarkarnama
मुंबई

BJP News : भाजपच्या निवडून आलेल्या नगरसेविकेला न्यायालयाचा दणका : पतीच्या कारभारामुळे थेट पदालाच स्थगिती

BJP News : बेलापूर न्यायालयाने भाजप नगरसेविका रूपाली किस्मत भगत यांच्या पदाला स्थगिती दिल्याने त्या नवी मुंबई महापौर निवडणुकीत मतदान करू शकल्या नाहीत. अनधिकृत बांधकामाप्रकरणी शिवसेना उमेदवार अश्विनी माने यांनी ही याचिका दाखल केली होती.

Hrishikesh Nalagune

Navi Mumbai News : नवी मुंबई महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका रूपाली किस्मत भगत यांच्या नगरसेवकपदाला बेलापूर न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे आज (ता. ५) झालेल्या महापौर निवडीच्या मतदान प्रक्रियेत त्या सहभागी होऊ शकल्या नाहीत. त्यांचे पती किस्मत भगत यांनी केलेल्या कथित अनधिकृत बांधकामावर महापालिकेने केलेल्या कारवाईसंदर्भात शिवसेनेच्या पराभूत उमेदवार अश्विनी माने यांनी ही याचिका दाखल केली होती.

नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ ब मधून रूपाली भगत निवडून आल्या होत्या; मात्र त्यांच्या पतीने केलेल्या अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या. या मुद्दयावर निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार अश्विनी माने यांनी न्यायालयात दाद मागितली. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने रूपाली भगत यांच्या नगरसेवकपदाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

मनाई आदेश :

पुढील सुनावणी गुरुवारी (ता. १२) होणार आहे. स्पष्टीकरण दाखल होईपर्यंत रूपाली भगत स्वतःला नगरसेवक म्हणून सादर करू शकणार नाहीत. तसेच नगरसेवकपदाशी संबंधित कोणतेही अधिकृत कामकाज करण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. आपली भूमिका मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महापौरपदी सुजाता पाटील :

नवी मुंबईच्या महापौरपदी सुजाता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपमहापौरपदी दशरथ भगत यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर पाटील आणि भगत यांचे अभिनंदन करण्यात आले. दरम्यान, निवडीनंतर आपल्या कार्यालयात जात सुजाता पाटील यांनी कार्यभार स्वीकारला.

महापालिका निवडणुकीत नवी मुंबईची निवडणूक विशेष गाजली. मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोप झाले. शिंदेंनी ताकद लावली मात्र नाईकांनी पुन्हा नवी मुंबईचे बाॅस आपणच हे दाखवून देत सत्ता मिळवली. नवी मुंबईच्या 111 जागांपैकी तब्बल 66 जागांवर भाजपने विजय मिळवला तर, शिंदेंच्या शिवसेनेला 24 जागांवर समाधान मानावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT