NCP vs Shivsena Sarkarnama
मुंबई

NCP vs Shivsena : नवी मुंबईसाठी अजितदादांची फिल्डिंग; काँग्रेसला धक्का देत, शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं

Youth Congress Leaders Join Ajit Pawar NCP in Navi Mumbai Anand Paranjape Criticizes Shiv Sena : नवी मुंबईमध्ये अजित पवार पक्षाने नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी करताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला टार्गेट केलं आहे.

Pradeep Pendhare

Navi Mumbai politics : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. मुंबई आणि नवी मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस 200 युवक कार्यकर्त्यांनी प्रवेश करताच, प्रवक्ते आनंद परांजणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली.

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते ॲटीव्ह झाले आहेत. पहिल्याच मोर्चे बांधणीत काँग्रेसला धक्का देत, 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घडवून आणला आहे.

काँग्रेसचे (Congress) युवक महाराष्ट्र सचिव अश्विन अघमकर यांच्यासह 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश झाला. या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादीचा काॅन्फिडंट वाढला आहे.

राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी यावेळी विरोधकांवर निशाणा साधताना, अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला टार्गेट केले. आमच्याकडे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देण्यास आमच्याकडे वेळ नाही. "कुत्रे भुंकते, हत्ती आपल्याच डौलात चालतो," अशा शब्दांत परांजपे यांनी विरोधकांवर टीका केली.

कोकणात सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार राजकीय लढाई सुरू आहे. एकमेकांना शह देण्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते टोकाची टीका करत आहे. यामुळे दोन्ही पक्ष महायुती असून देखील त्यांचे संबंध ताणले गेले आहे. रायगडमधील पालकमंत्रिपदावर या पक्षामध्ये संबंध ताणले गेले असून, याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT