Sanjay Raut-Devendra Fadnavis
Sanjay Raut-Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

नवनीत राणा आरोप : ‘संजय पांडेंनी पुरावा देत फडणवीसांना उघडे पाडले’

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ‘‘मुंबई पोलिस आणि आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्यावर भाजपकडून लावण्यात आलेले आरोप, हे कसे बिनबुडाचे आणि खोटे आहेत, हे सीसीटीव्ही फूजेटच्या पुराव्यासह दाखवून दिले आहे. आरोपी असलेले नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवि राणा (Ravi Rana) यांच्याशी पोलिस कसे सौजन्याने वागतात, हे त्यात दिसून येत आहे. त्यांना पाणी, चहा दिल्याचे त्यात स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणात विरोधी पक्षनेते उघडे पडले आहेत,’’ असा टोला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नााव न घेतला लगावला. (Navneet Rana Allegations : Sanjay Pandey exposes Fadnavis by giving evidence)

खासदार संजय राऊत हे मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी राणा दांपत्यांनी पोलिसांवर केलेले आरोप आणि संजय पांडे यांनी ट्विट केलेला व्हिडिओ यावर भाष्य केले. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. भाजपने पहिल्यांदा राजकारणी, शिवसेना, महाविकास आघाडी यांना लक्ष्य केले. आता कायदेशीर कारवाई करणाऱ्या पोलिसांवर त्यांच्याकडून हल्ले करण्यात येत आहेत. अशा प्रकारच्या कामाच्या पद्धती या अतिरेक्यांच्या असतात. पोलिस, तपास यंत्रणावर हल्ला करून त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

गेली काही दिवसांपासून भाजपकडून पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यावर हल्ले करण्यात येत आहेत. पांडे हे चुकीच्या पद्धतीने दबावाखाली काम करत आहेत, असा आरोप भाजपकडून त्यांच्यावर लावला जात आहे. पण, पांडे हे एक सक्षम अधिकारी आहेत. काल मुंबई पोलिस आणि त्यांच्याविरुद्ध आरोप झाला की, खार पोलिस ठाण्यासंदर्भात विशेष करून राणा दांपत्य यांच्या संदर्भात आरोप झाले. ‘मला पाणी दिले नाही, पोलिसांनी आमची जात काढली,’ असा आरोप केला गेला. मात्र, राणा दाम्पत्यावरच कारवाई झाली पाहिजे. कारण, त्यांचं जात प्रमाणपत्र हे खोटं आहे, अशी मागणीही राऊत यांनी केली.

ते म्हणाले की, संजय पांडे यांनी पोलिसांवर लावलेले आरोप कसे बिनबुडाचे आणि खोटे असतात, हे पुराव्यासह दाखवून दिलं आहे. आरोपी राणा दांपत्यासाठी पोलिस कसे सौजन्याने वागतात, हे दिसून येत आहे. त्यांना चहा दिलेला आहे. हे सीसीटीव्ही फुजेटमध्ये दिसून येत आहे. या प्रकरणात राज्याचे विरोधी पक्षनेते हे उघडे पडले आहेत. विरोधी पक्ष हे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अतिशय जबाबदारीने बोललं पाहिजे, आरोप केला पाहिजे. दुर्दैवाने या सगळ्या चिखलफेकीत विरोधी पक्षनेते देखील सामील झालेले आहेत आणि स्वतःवर चिखल उडवून घेत आहेत.

राणा, सोमय्या प्रकरणात विरोधी पक्षनेते कारवाईत उघडे पडले आहेत. ते पत्र लिहितात, केंद्राला की महाराष्ट्रावर कारवाई करावी. पण राणा बाईंशी पोलिस कसे सौजन्याने वागले आहेत, याचा प्रत्यक्ष पुरावा आलेला आहे, त्यावर विरोधी पक्षनेत्यांनी बोलले पाहिजे. या प्रकरणी विरोधी पक्षनेत्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT