Deputey Chief Minister Ajit Pawar
Deputey Chief Minister Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar : विक्रम काळे मंत्री करा म्हणतो अन् इतक्या मागण्या करतो, की मी दबकतच आलो..

शिक्षकांना उद्देशून बोलतांना चांगले काम करा, कोरोना काळात आम्ही तुम्हाला घरी बसून पगार दिला, याची आठवण देखील अजित पवारांनी करून दिली. (Ajit Pawar)
Published on

औरंगाबाद : एकदा सुप्रिया सुळेच्या उपस्थितीत सतीश चव्हाणांच्या सत्काराचा कार्यक्रम होता. तेव्हा भाषण करतांना विक्रमनेच मला मंत्री करा, अशी मागणी केली. बरं उदाहरण दिलं चंद्रकांत पाटलांच. (Ncp) म्हणाला ते पहिल्यांदाच आमदार झाले तर त्यांना मंत्री केल, आणि मी तीन टर्म आमदार तरी मला मंत्रीपद नाही. तर असा हा आमचा विक्रम कायम मागण्या करत असतो. त्यामुळे आज त्याच्या कार्यक्रमाला मी दबकत दबकतच आलो, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्या निधीतून पुस्तक वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला. (Aurangabad) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली. अजित पवार देखील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते. यावेळी अजित पवारांनी आपल्या खास शैलीत विक्रम काळे यांना चिमटे काढले.

अजित पवार म्हणाले, आमचा विक्रम विधानसभेत नेहमी माझ्याकडे चिठ्या पाठवून शाळांच्या अनुदानाचे काय झाले, याचे काय झाले, असे विचारत असतो. त्याला सांगावे लागते की बाबा तीन पक्षाचे सरकार आहे, टप्याटप्याने सगंळ होईल. एकदा औरंगाबादेतच सुप्रियाच्या उपस्थितीत सतीश चव्हाण यांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात मला मंत्री करा, अशी मागणीच विक्रम ने केली.

म्हणाला, चंद्रकांत पाटील पहिल्यादाच आमदार झाले तर त्यांना मंत्री केल. मी तर तीन टर्म आमदार आहे, तरी मला मंत्री करत नाही. सतीश चव्हाण अ्वाकच झाले. म्हणाले सत्कार माझा आणि मंत्रीपद विक्रम मागतोय. मग लक्षात आल्यावर म्हणाला, सतीश चव्हाण सिनियर आहे, त्यांनाही मंत्री करा, म्हणजे दोघांनी मंत्री करण्याची मागणी केली. तर असा आमचा विक्रम.

Deputey Chief Minister Ajit Pawar
Sharad Pawar : बजेटपेक्षा मागण्याच जास्त होतात, म्हणून मी शिक्षण मंत्रीपद सोडलं होतं..

त्याच्यामुळे त्याच्या कार्यक्रमाला मी दबकत दबकतच आलो, असे सांगत सभागृहात उपस्थितांनी टाळ्या वाजवून अजित पवारांच्या या टिप्पणीवर प्रतिसाद दिला. शिक्षकांना उद्देशून बोलतांना चांगले काम करा, कोरोना काळात आम्ही तुम्हाला घरी बसून पगार दिला, याची आठवण देखील अजित पवारांनी करून दिली.

Deputey Chief Minister Ajit Pawar
Aurangabad : जमावबंदी आदेश सभेमुळे काढलेला नाही ; वर्षभर असे आदेश असतात..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com