mohit kamboj, Nawab Malik
mohit kamboj, Nawab Malik sarkarnama
मुंबई

मलिकांच्या अटकेनंतर कंबोजांना तलवार दाखवणं पडलं महागात

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना बुधवारी ईडीने अटक केली. त्यानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज (mohit kamboj)यांनी जल्लोष केला. त्यांच्या घराजवळ कार्यकर्ते जमले होते. जल्लोष करताना कंबोज यांनी तलवार काढली. तलवार काढणं मोहित कंबोज यांना महागात पडलं आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर कंबोज यांनी रस्त्याच्या मधोमध तलवार काढून ती दाखवली होती. याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड नियमांचे उल्लंघन करण्यासह शस्त्रास्त्र कायद्यांच उल्लघंन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मुंबईत क्रुझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने छापा टाकल्यानंतर मलिकांनी कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यानंतर कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांच्याकडे बेनामी संपत्ती असल्याचा आरोप केला होता. यावरुन दोघांमध्य टि्वट युद्ध रंगले होते. त्यामुळे नवाब मलिक आणि मोहित कंबोज यांच्यातील वाद जगजाहीर आहे.

मलिक यांना बुधवारी ई़डीने अटक केल्यानंतर मोहित कंबोज यांनी सांताक्रुझ येथे कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केला. मलिकांच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी त्यांनी थेट म्यानातून तलवार उपसली होती. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गुन्हा दाखल केला आहे. यावर मोहित कंबोज म्हणाले, ''सरकारच्या सांगण्यावरून पोलिसांनी जबरदस्ती माझ्यावर हा गुन्हा दाखल केला आहे,''

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टी आजपासून (गुरुवार) निदर्शने सुरू करणार आहेत, अशी घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने १९९३ बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी अटक केली. कोर्टाने त्यांना ३ मार्चपर्यंत कोठडी दिली. अनिल देशमुखांचा राजीनामा ताबडतोब घेणारे शरद पवार साहेब नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळा निर्णय करत आहेत. विशिष्ट समुदायाला दुखावणे त्यांना जमणार नाही. पण महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांची जनता हे सहन करणार नाही. (nawab malik bjp leader mohit kamboj charged fir after maliks arrest was show the sword)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT