cruise ship Sarkarnama
मुंबई

तुझा मेसेज 35 अधिकाऱ्यांना जातो...सर्वजण वाट बघत आहेत! क्रूझवर होता ट्रॅप?

किरण गोसावी अन् खबऱ्यातील संवाद व्हायरल...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मंगळवारी पुन्हा एकदा क्रूझवर (Cruise Drug Case) आर्यन खानला पकडण्यासाठी सापळा रचल्याचा दावा केला आहे. किरण गोसावी व त्याच्या खबऱ्यामध्ये व्हॉट्सअपवर झालेल्या संवादाचे स्क्रीनशॉट मलिकांनी ट्विट केले आहेत. मलिकांनी सकाळी दोनवेळा ट्विट करून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर मलिकांकडून दररोज आरोप केले जात आहे. वानखेडे यांनी वसुलीसाठी आर्यन खानला बनावट प्रकरणात (Aryan Khan Case) अडकवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मंगळवारी सकाळी मलिकांनी दोन ट्विट केली आहेत. क्रूझ प्रकरणाचा साक्षीदार के. पी. गोसावी आणि त्याच्या खबऱ्यामध्ये (Informer) मध्ये व्हॉट्सअपवर झालेला संवाद या ट्विटमध्ये आहे. पहिल्या ट्विटमधील संवादामध्ये के. पी. गोसावी खबऱ्याला काशिफसह इतर काही जणांचे फोटो मागत आहे. दोघांमध्ये क्रूझवर येणाऱ्यांबाबत संवाद झाल्याचे या चॅटवरून दिसते. या चॅटचा स्क्रीनशॉट पोस्ट करत मलिकांनी काशिफ खानची या प्रकरणात चौकशी का केली नाही, काशिफ खान आणि समीर दाऊद वानखेडे या दोघांमधील संबंध का आहेत, असे सवाल उपस्थित केले आहेत.

दुसऱ्या ट्विटमध्ये किरण गोसावी हा खबऱ्याकडून क्रूझवर येणाऱ्यांची माहिती मागत असल्याचे दिसते. कन्फ्युज करू नकोस...तुझा मेसेज 35 अधिकाऱ्यांना जातो, सगळे अधिकारी वाट बघत आहेत. फक्त मेसेज कर, कॉल नाही लागणार, मला आताचे फोटो हवे आहेत, तू पाठव, इथे खूप गर्दी असल्याने शोधू शकत नाही, असं गोसावी त्याच्या खबऱ्याला सांगत आहे. तर त्यांना यायला चार तास उशीर होईल, चार वाजता यायला सुरूवात होईल, त्यावेळी सगळे लोक तिथे असतील, खूप गर्दी होईल, असं खबऱ्याकडून गोसावीला सांगितले जात असल्याचे मलिक यांनी पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये दिसते.

या संवादाचे स्क्रीनशॉट शेअर करत मलिकांनी पुन्हा एकदा क्रूझवरील कारवाईसाठी सापळा रचल्याचा आरोप केला आहे. या संवादावरून क्रूझवरील पार्टीत जाणाऱ्यांना सापळ्यात अडकवण्याचा प्लॅन होता, असं चॅटवरून दिसत असल्याचे मलिकांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ही समीर दाऊद वानखेडे यांची प्रायव्हेट आर्मी असल्याने त्यांना याची उतरे द्यावी लागतील, अशी टीकाही मलिकांनी केली आहे.

दरम्यान, ''सॅम डिसोझा यांने दिल्लीत पैसे दिल्याची माहिती दिली आहे. सॅम डिसोझा हा वानखेडे निर्दोष असल्याचे सांगत आहे. तो समीर वानखेडेंचा प्रायव्हेट ड्रग्ज डीलर आहे. क्रूझ वरील पार्टीचा आयोजक काशिफ खान होता. काशिफ खान याला अजून का पकडण्यात आले नाही. काशिफ खान हा गोव्यात आहे," अशी माहिती मलिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT