Sameer Wankhede, Nawab Malik sarkarnama
मुंबई

गोसावीच्या बॉडीगार्डच्या बॉम्बनंतर वानखेडेंचे 'ते' शब्द मलिकांनाही आठवले!

नवाब मलिक यांनी एक ट्विट केलं आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सुपरस्टार शाहरूख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. आर्यनच्या सोडवण्यासाठी किरण गोसावीने (Kiran Gosavi) डील केल्याचा आरोप त्याच्या बॉडीगार्डने केला आहे. एनसीबीचे विभीगीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनाहीही त्यातील काही पैसे जाणार होते, असंही त्यानं म्हटलं. हा प्रकार समोर आल्यानंतर वानखेडे यांच्यावर सतत टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एक ट्विट केलं आहे.

न्यायालयाने त्याचा जामीन नुकताच फेटाळला. त्यामुळे त्याला आणखी काही काळ पोलिस कोठडीत राहावे लागणार आहे. आर्यन खान याचा जामीन फेटाळल्यानंतर वानखेडे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली होती. ही प्रतिक्रिया त्यांनी दोनच शब्दांत दिली. त्यांनी दोनच शब्दांत साऱ्या प्रकरणाबद्दल सूचक प्रतिक्रिया दिली ते शब्द होते `सत्यमेव जयते!`. अगदी दोन बोटे उंचावून आपली प्रतिक्रिया देत ते न्यायालयातून बाहेर पडले.

रविवारी किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने थेट आरोप केले आहेत. याबाबतचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनंतर मलिक यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'सत्य ही जीतेगा, सत्यमेव जयते', असं मलिक म्हणाले आहेत. आर्यनचा जामीन फेटाळल्यानंतर वानखेडे यांनी दिलेल्या प्रतिक्रियाला हे उत्तर असल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.

प्रभाकरने काय आरोप केले आहेत?

प्रभाकर साईलने व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, आर्यनला ताब्यात घेतेल त्या रात्री आम्ही एनसीबीच्या कार्यालयाकडून लोअर परेलच्या दिशेने गेलो. तिथे एका पुलाखाली आमची गाडी थांबली. आमच्यामागे निळ्या रंगाची मर्सिडीज थांबली. त्या गाडीत एसआरकेची मॅनेजर होती. त्यानंतर गोसावी व सॅम सोबत त्यांची मिटींग झाली. त्यामध्ये काय झाले ते त्यावेळी मला कळलं नाही. पण गाडीतून त्यांनी परत फोन केला. 25 चा बाँड टाक, लास्ट 18 ला कर. कारण 8 समीर वानखेडेंना जाणार आहेत. आणि 10 आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, असं ठरल्याचं प्रभाकर याने म्हटलं आहे.

आर्यनला एनसीबीच्या कार्यालयात आणल्यानंतर काही वेळाने गोसावीला सॅम नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्यानंतर वेगवेगळ्या गाड्यांमध्ये आम्ही एका ठिकाणी गेलो. तिथे एका निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये शाहरुख खानची मॅनेजर पूजा दडलानी हिला दोघे भेटले. त्यामध्ये त्यांची बोलणी झाली. त्यानंतर गोसावीसह आम्ही दोघे वाशीच्या घरी गेलो. सकाळी पुन्हा ताडदेवला इंडियाना हॉटेलजवळ प्रभाकर आला. तिथे एका गाडीतून 50 लाख रुपये घेऊन पुन्हा वाशीला आल्याचा खुलासा प्रभाकरने केला आहे.

प्रभाकर 50 लाख घेऊन गोसावीला वाशीतील इनऑरबीट मॉलजवळ गेला. तेथून गोसावीने पून्हा पैशाची पिशवी प्रभाकर कडे देऊन ती सॅमला देण्यास सांगितली. त्यानुसार प्रभाकर पैसे घेऊन सॅमकडे गेला. पण त्यावेळी पिशवीत 38 लाख रुपयेच होते. त्यातील 12 लाख नव्हते, असा खुलासाही प्रभाकरने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT