खळबळजनक : वानखेडेंनी आर्यनला ताब्यात घेतलं अन् गोसावीने शाहरूखकडून 50 लाख उकळले

गोसावी सध्या फरार असून पोलिसांनी त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याला अटक केली आहे.
Kiran Gosavi, Aryan Khan
Kiran Gosavi, Aryan Khansarkarnaam
Published on
Updated on

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं असून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. किरण गोसावीचा बॉडीगार्ड याने केलेल्या खुलाशांमुळे खळबळ उडाली आहे. आर्यनला एनसीबीने पकडल्यानंतर त्याच रात्री गोसावी व सॅम नावाचा व्यक्ती शाहरुखच्या मॅनेजरला भेटले होते. त्यावेळी त्यांच्या पैशांची बोलणी झाली होती. त्यानंतर सकाळी एका व्यक्तीकडून 50 लाख रुपये घेतल्याचा खुलासा बॉडीगार्डने केला आहे.

'साम'ने दिलेल्या exclusuve वृत्तात हा दावा केला आहे. गोसावी सध्या फरार आहे. प्रभाकरचे अॅफिडेविट सामच्या हाती लागले आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कार्डिलिया क्रुझवर छापेमारी करत आर्यनसह काही जणांना अटक केली. यावेळी त्यांनी ज्या पंचाच्या सह्या घेतल्या आहेत, त्यामध्ये गोसावीसह प्रभाकरचंही नाव आहे.

Kiran Gosavi, Aryan Khan
राजेश टोपे तुरूंगात जाणार; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक दावा

प्रभाकरच्या अॅफिडेविटमध्ये याबाबतचे खुलासे करण्यात आले आहे. आर्यनला एनसीबीच्या कार्यालयात आणल्यानंतर काही वेळाने गोसावीला सॅम नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्यानंतर वेगवेगळ्या गाड्यांमध्ये आम्ही एका ठिकाणी गेलो. तिथे एका निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये शाहरुख खानची मॅनेजर पूजा दडलानी हिला दोघे भेटले. त्यामध्ये त्यांची बोलणी झाली. त्यानंतर गोसावीसह आम्ही दोघे वाशीच्या घरी गेलो. सकाळी पुन्हा ताडदेवला इंडियाना हॉटेलजवळ प्रभाकर आला. तिथे एका गाडीतून 50 लाख रुपये घेऊन पुन्हा वाशीला आल्याचा खुलासा प्रभाकरने केला आहे.

प्रभाकर 50 लाख घेऊन गोसावीला वाशीतील इनऑरबीट मॉलजवळ गेला. तेथून गोसावीने पून्हा पैशाची पिशवी प्रभाकर कडे देऊन ती सॅमला देण्यास सांगितली. त्यानुसार प्रभाकर पैसे घेऊन सॅमकडे गेला. पण त्यावेळी पिशवीत 38 लाख रुपयेच होते. त्यातील 12 लाख नव्हते, असा खुलासाही प्रभाकरने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com