Nawab Malik- Devendra Fadanvis  Sarkarnama
मुंबई

'हा खेळ देवेंद्र फडणवीसांनी सुरू केला': मलिकांचे फडणवीसांवर गंभीर आरोप

आमच्यावरही तपास यंत्रणांकरवी दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहेत

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहीत भाजप आणि इडीवर गंभीर आरोप केले आहेत. 'महविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणण्यात आला, मला धमकावण्यात आले. ईडीचा (ed) ससेमिरा मागे लावण्यात आला. पण त्यांच्या दबावाला मी बळी पडलो नाही. असे एक ना अनेक गंभीर आरोप संजय राऊत यांनी केले आहेत. या मुद्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) प्रवक्ता नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही थेट माजी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.

'हा सगळा खेळ देवेंद्र फडणवीसांनी सुरू केला. त्यांना ओएसडी करून टाका. तेच रोज ईडीच्या अधिकाऱ्यांना कोणावर कारवाई करायची ते सांगत असतात, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, शिवसेना, कॉंग्रेससह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरही तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचेही ते म्हणाले. पण ईडीच्या अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षाच्या एजंटप्रमाणे कामे करू नयेत. आम्ही आता राज्यात सत्तेत आहोत लवकरच केंद्रातही सत्ता स्थापन करु, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील ईडीची नोटीस पाठवली होती. आमच्यावरही तपास यंत्रणांकरवी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते जेवढा दबाव टाकतील तेवढ्याच क्षमतेने आम्ही उभारून वर येऊ. महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही, असेही मलिक यावेळी म्हणाले. केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यांचे काय चालले आहे हे देखील आम्हाला माहित आहे, भाजपला कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार पाडायचे आहे. त्यासाठी ते काहीही करत सुटले आहेत.

सरकार पाडण्यासाठी भाजप नेते शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या पाठीमागे तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लावत आहेत. त्यांनी वाटतेय की आमचे नेते घाबरुन सरकारमधून बाहेर पडतील आणि आमच्यामागे येतील. पण त्यांचा हा गैरसमज आहे, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला आहे. पण दबाव टाकून त्यांना सत्ता मिळवता येणार नाही. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींना पत्रात लिहलेली सर्व सत्य परिस्थिती आहे. ईडीचे काही अधिकारी राजीनामा देत आहेत. त्यांना भाजप निवडणुकीसाठी तिकीट देत आहे. तपास यंत्रणांचे अधिकारी भाजपचे कार्यकर्ते झाल्यासारखे वागत आहेत. पण त्यांनी काहीही केलं तरी 5 वर्ष काय 25 वर्ष हे सरकार चालणारच. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT