बंडातात्या पोलिस ठाण्यात आले आणि लगेच निघून गेले...

वाईन Wine विक्रीचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी व्यसन मुक्त युवक संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वारकरी यांनी बंडातात्या कराडकर Bandatatya Karadkar यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी Collector office कार्यालयासमोर आंदोलन केले होते.
Bandatatya Karadkar
Bandatatya Karadkarsarkarnama
Published on
Updated on

सातारा : जमावबंदी आदेशाचा भंग करून दंडुका, दंडवत आंदोलन करणे व महिला नेत्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशीसाठी हभप बंडातात्या कराडकर आज सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. तपासी अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर ते लगेच निघून गेले.

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी व्यसन मुक्त युवक संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वारकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. यावेळी आंदोलनात अचानक सहभागी होत, बंडातात्या कराडकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या महिला नेत्यांविषयी आक्षेपार्य वक्तव्य केले होते.

Bandatatya Karadkar
'हभप' पदवीला मलीन करण्याचा बंडातात्या कराडकरांचा प्रयत्न....

तसेच जमावबंदीचा आदेश असताना जमाव जमवून आंदोलन केल्याबद्दल सातारा शहर पोलिसांनी जमावबंदी आदेशाच्या भंगाचा गुन्हा बंडातात्यासह १५० जणांवर दाखल केला होता. तसेच महिला नेत्यांविषयी आक्षेपार्य वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव यांनी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

Bandatatya Karadkar
मी क्षमा मागतो! अडचणीत येताच बंडातात्या माफी मागून झाले मोकळे!

या गुन्ह्यांच्या अनुषंगाने चौकशीसाठी सातारा पोलिसांनी बंडातात्यांना आज बोलावले होते. त्यानुसार बंडातात्या आज सातारा शहर पोलिसात दाखल झाले आहेत. या दोन गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपासी अधिकाऱ्यांने चौकशी केली. त्यानंतर अल्पवेळातच बंडातात्या निघूनही गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com