Nawab Malik_Sameer Wankhede Sarkarnama
मुंबई

ही फक्त सुरुवात आहे...आर्यन खान प्रकरणाचा तपास वानखेडेंकडून काढल्यानंतर मलिकांचे सूचक ट्विट

यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही ते करू

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह एकूण सहा प्रकरणांचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. केंद्रीय एनसीबीने ही सहा प्रकरणे संजय सिंह यांच्या पथकाकडे सोपविण्याचा निर्णय आज घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. ही फक्त सुरुवात आहे, असे सूचक ट्विट त्यांनी केले आहे. (Nawab Malik's suggestive tweet after Aryan Khan drug case removed from Wankhede)

वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणचा तपास काढून घेण्यात आल्यानंतर नवाब मलिक यांनी तातडीने ट्विट करत त्यावर आपली प्रतिक्रिया दिला आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आर्यन खान प्रकरणासह पाच प्रकरणांचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आलेला आहे. मात्र, ही फक्त पाचच प्रकरणे नव्ह तर एकूण २६ प्रकरणे तपासण्याची गरज आहे. ही तर फक्त सुरुवात आहे... ही यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही ते करू, असा गर्भित इशाराही मलिक यांनी आपल्या ट्विटमधून दिला आहे.

आता संजय सिंह करणार तपास

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास केंद्रीय अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेतला आहे. या प्रकरणाचा तपास आता मुंबई एनसीबीऐवजी दिल्ली एनसीबीचे पथक करणार आहे, त्याची जबाबदारी ही दिल्ली एनसीबीचे संजय सिंह यांच्यावर सोपविण्यात आली आहे, अशी माहिती एनसीबीच्या दक्षिण-पश्चिम विभागाचे उपमहानिदेशक मुथा अशोक जैन यांनी सांगितले. हा प्रशासकीय निर्णय आहे, असेही जैन यांनी म्हटले आहे.

माझ्या बदलीची फक्त अफवा

दरम्यान, अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयातून माझी कुठेही बदलली झालेली नाही. एनसीबीच्या मुंबई विभागाच्या डायरेक्टरपदी मी अजूनही कायम आहे. मुंबई एनसीबीकडील फक्त सहा प्रकरणाचा तपास दिल्लीच्या टीमकडे सोपविण्यात आलेला आहे. माझ्या बदलीच्या फक्त अफवा आहेत, असे मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी बदलीच्या अफवांवर स्पष्टीकरण दिले. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, माझी बदली झालेली नाही. मी अद्यापही झोनल डायरेक्टर पदावर कायम आहे. बदलीच्या फक्त अफवा आहेत. मुंबई एनसीबीकडील फक्त 6 केसेस दिल्ली एनसीबीच्या टिमकडे देण्यात आल्या आहेत. आर्यन खान आणि समीर खान यांच्या केसचा तपास त्या टीमकडून होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT