माझी बदली झाली नसून मी मुंबई एनसीबीच्या झोनल डायरेक्टर पदावर कायम : समीर वानखेडे

बदलीच्या फक्त अफवा आहेत.
Sameer Wankhede
Sameer WankhedeSarkarnama

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयातून माझी कुठेही बदलली झालेली नाही. एनसीबीच्या मुंबई विभागाच्या डायरेक्टरपदी मी अजूनही कायम आहे. मुंबई एनसीबीकडील फक्त सहा प्रकरणाचा तपास दिल्लीच्या टीमकडे सोपविण्यात आलेला आहे. माझ्या बदलीच्या फक्त अफवा आहेत, असे मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी बदलीच्या अफवांवर स्पष्टीकरण दिले. (I have not been transferred and I am still the Zonal Director of Mumbai NCB : Sameer Wankhede)

आर्यन खानसह एकूण सहा प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढून तो दिल्ली एनसीबीच्या टीमकडे सोपविण्यात आला आहे. त्याचे नेतृत्व संजय सिंह हे करणार आहेत. त्याचबरोबर काही माध्यमांनी वानखेडे यांची बदली झाल्याचे सांगितले होते. त्याचा खुलासा समीर वानखेडे यांनी केला आहे. त्यात त्यांनी आपली बदली झाली नसून मी अजूनही मुंबईचा झोनल डायरेक्टर असल्याचे सांगितले आहे.

Sameer Wankhede
समीर वानखेडेंना दणका : आर्यन खान प्रकरणाचा तपास एनसीबीने काढून घेतला!

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, माझी बदली झालेली नाही. मी अद्यापही झोनल डायरेक्टर पदावर कायम आहे. बदलीच्या फक्त अफवा आहेत. मुंबई एनसीबीकडील फक्त 6 केसेस दिल्ली एनसीबीच्या टिमकडे देण्यात आल्या आहेत. आर्यन खान आणि समीर खान यांच्या केसचा तपास त्या टीमकडून होणार आहे.

Sameer Wankhede
कंपनीत गाड्या लावतो, असे सांगून माजी सरपंचाने २५० जणांना लावला कोट्यवधींचा चुना

आयपीएस संजय सिंह यांच्या नेतृत्वात दिल्लीची टीम ही एकूण सहा प्रकरणाचा तपास करणार आहे. संजय सिंह यांची मुंबईचे झोनल म्हणून नियुक्ती झाली नसून ते या सहा प्रकरणांचा तपास करणार आहेत, असेही समीर वानखेडे यांनी यांनी पत्रात म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, मी मुंबईतच झोनल डायरेक्टर म्हणून कायम आहे. आर्यन खान, समीर खान आणि इतर 4 केसेसच्या तपासासाठी एनसीबी दिल्लीने एका विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. मी माझ्या याचिकेत म्हटलं होतं की या दोन केसेसचा कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपास करण्यात यावा, त्यानुसार या चौकशी पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे, असे समीर वानखडे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com