मुंबई : अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. ही कारवाई करणारे अंमली पदार्थ नियामत विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (ncb sameer wankhede) यांना पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे एनसीबीच्या झोनल डिरेक्टरपदी वानखेडे पुढील सहा महिने कायम राहतील.
समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. समीर वानखेडे (ncb sameer wankhede)यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. समीर वानखडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार महाराष्ट्र पोलिस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यांच्यावर पाळत ठेवण्याच्या घटनेबाबत मुंबई पोलिस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश दिले आहेत.
पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त सहपोलिस आयुक्त पदाच्या अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाळत ठेवण्याबाबत कुठल्याही सूचना देण्यात आल्या नव्हत्या, असे माध्यमांना सांगितले होते
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ या जहाजावरील ड्रग्ज पार्टीवर २ ऑक्टोबरला घातलेल्या छाप्याचं त्यांनी नेतृत्व करत अनेकांना ताब्यात घेतलं. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह जवळपास २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. समीर वानखेडेंच्या नेतृत्वात झालेल्या या कारवाईवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी संशय व्यक्त केला आहे. वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. वानखेडे हे निलंबित पोलिस सचिन वाझे, पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा याच्या कॅटगॅरीतील असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून आपल्यावर अनधिकृतरित्या पाळत ठेवली जात असल्याची तक्रार समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. "गेल्या ३६ ते ४८ तासांपासून आपल्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही आपल्याकडे आहेत. या सीसीटीव्ही फुटेजनुसार, दोन साध्या कपड्यातील व्यक्ती त्यांच्या मागावर असतात,'' अशी तक्रार वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.
वानखेडे ही २००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून काम पाहिलं आहे. समीर वानखेडे यांची सप्टेंबर २०२० मध्ये महसूल गुप्तचर संचालनालयातून एनसीबीमध्ये बदली झाली होती. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्जविरोधी कारवायांचा धडाका सुरू झाल्यापासून समीर वानखेडे चर्चेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.