Aryan khan
Aryan khan Sarkarnama
मुंबई

एनसीबीवर नामुष्की! आर्यन खान प्रकरणातील दोन वरिष्ठ अधिकारी निलंबित

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला क्रूझ ड्रग्ज पार्टी (Drugs Party) प्रकरणी अटक झाली होती. आता या प्रकरणात मोठी घ़डामोड घडली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आर्यन खान प्रकरणात अमली पदार्थ विरोधी विभागाच्या (NCB) संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आता एनसीबीवर आपल्याच दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची नामुष्की ओढवली आहे.

आर्यन खानला ३ ऑक्टोबर २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. आर्यनसह १९ जणांवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आर्यन आणि इतर १७ जणांना जामीन मिळाला आहे. या प्रकरणातील एक आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आता एनसीबीने आपल्याच दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. अधीक्षक व्ही.व्ही. सिंग आणि गुप्तचर अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांना निलंबित करण्यात आले. संशयास्पद हालचाली केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. आर्यन खानसह अनेक महत्वाच्या प्रकरणांमध्ये हे तपास अधिकारी आहेत.

दरम्यान, या कारवाईची पडताळणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाची चौकशी अद्याप पूर्ण झाली नसली तरी या एसआयटीचे काही खुलासे माध्यमांसमोर आले आहेत. यात प्रथमदर्शनी आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज आढळलेच नव्हते, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आर्यन खानला केलेली अटक आणि एकूणच संपूर्ण कारवाई एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांना भोवण्याची दाट शक्यता आहे. (Aryan Khan Drugs Case News Updates)

यावर एनसीबीचे विभागीय संचालक संजय सिंग यांनी स्पष्टीकरण देत असे खुलाश्यामध्ये तथ्य नसल्याचे सांगितले होते. संजय सिंग म्हणाले होते की, माध्यमांमधील बातम्या या धक्कादायक आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. या अहवालाची एनसीबीने अद्याप पडताळणी केलेली नाही. तसेच तपास देखील पूर्ण झालेला नाही. आताच काहीही सांगता येणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT