तो मुलगा कुणाचा? गणेश नाईकांच्या 'डीएनए टेस्ट'साठी शिवसेना सरसावली

भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत.
Ganesh Naik
Ganesh NaikSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजप (BJP) नेते आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) हे आता चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याबाबत नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी तपास करून दोन दिवसात अहवाल द्यावा, असा आदेश राज्य महिला आयोगाने दिला आहे. यातच आता शिवसेनेने (Shivsena) नाईकांच्या डीएनए चाचणीसाठी आग्रह धरला आहे.

संबंधित महिलेने आज शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांची भेट घेतली. ती म्हणाली की, मी नीलम ताईंकडे तक्रात घेऊन आली आहे. गणेश नाईक यांचे मूल मला आहे. मला न्याय मिळावा. मी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. 1993 पासून मी गणेश नाईक यांना ओळखते. माझ्या मुलाला त्याचा हक्क मिळावा, हे मला अपेक्षित आहे. माझा आता गणेश नाईक यांच्यावर विश्वास राहिला नाही.त्यांनी मला जे करायचे ते करा, असं सांगितलं आहे.

Ganesh Naik
रुपाली चाकणकरांमुळे भाजपचा बडा नेता आला चांगलाच अडचणीत

गोऱ्हे यांनी म्हटले आहे की, गणेश नाईक यांच्याशी 1993 पासून त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत, असे ही महिला सांगत आहे. मी नवी मुंबई पोलिसांशी बोलले आहे. त्यांनी मला अदखलपात्र गुन्हा नोंद केल्याचे सांगितले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून नाईकांची डीएनए टेस्ट करावी, अशी मागणी केली आहे. नाईकांनी डी एन ए टेस्ट साठी समोर यावे, असे माझे आवाहन आहे, त्या मुलाला न्याय मिळायला हवा. डोक्याचा एक केस काढला तरीही डीएनए टेस्ट होऊ शकते. शिवसेना जे शक्य आहे ते करणार आहे. गणेश नाईक यांचे नवी मुंबईतील स्थान होते ते आता कमी होत आहे. जनता अशा नेत्यांवर विश्वास तरी ठेवणार का?

Ganesh Naik
राज ठाकरेंनी उद्या संघाची चड्डी घातली तर नवल वाटणार नाही!

या महिलेने पोलिसांकडे लेखी तक्रार देऊनही कारवाई करण्यात आली नाही, या महिलेला व तिच्या मुलाला पोलिसांनी सुरक्षाही पुरवली नाही. त्यामुळे नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा व आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे केली होती. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ४२०, ५०४, व ५०६ नुसार नाईकांवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणीही तिने केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दोन दिवसात याप्रकरणी तपास करून त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com