Sunil Tatkare On Nitesh Rane Sarkarnama
मुंबई

Video Sunil Tatkare : अजितदादांच्या नेत्यानं केला भाजप आमदाराचा निषेध

Sunil Tatkare On Nitesh Rane's Statement : "रामगिरी महाराजांनी सिन्नरमधील प्रवचनात जो मुद्दा मांडला तो सतत मांडत रहावा, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे. जर महाराजांच्या विरोधात कोणी बोललं तर मशिदीत घुसून चून-चून के मारेंगे."

Jagdish Patil

Mumbai News, 03 Sept : "रामगिरी महाराजांनी सिन्नरमधील प्रवचनात जो मुद्दा मांडला तो सतत मांडत रहावा, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे. जर महाराजांच्या विरोधात कोणी बोललं तर मशिदीत घुसून चून-चून के मारेंगे," असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलं आहे.

राणेंच्या याच वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते सुनील तटकरे यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अजित पवारांनी जागावाटपाबाबत केलेल्या वक्तव्यावरही स्पष्टीकरण दिलं.

सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, "जनसन्मान यात्रेचा दुसरा टप्पा संपला असून आता आम्ही तिसऱ्या टप्प्याच्या तयारी संदर्भात चर्चा केली. जागावाटपाबाबत चर्चा केली. अजित पवार 60 जागांच्या आसपास जागा असतील असं बोलले होते. त्यांचं‌ तेवढंच वक्तव्य घेऊन चर्चा केली जात आहे. पण तो आकडा धरून पुढं‌ जावं असा मतितार्थ त्यांच्या बोलण्याचा होता."

नितेश राणेंच्या वक्तव्याचा निषेध

यावेळी पत्रकारांनी नितेश राणेंनी (Nitesh Rane) मशिदी संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारताच तटकरे म्हणाले, "मी नितेश राणेंच्या वक्तव्याचा निषेध करतो. कुणीही असं वक्तव्य करू नये. व्यक्तिगत करू शकता पण धर्माची आलोचना करणं योग्य नाही. हे वक्तव्य चांगलं नाहीये. नितेश राणेंचं वक्तव्य अयोग्य आणि चुकीचं आहे. हा देश संविधानाच्या आधारे चालतो. वेगवेगळी मतं असू शकतात पण असं वक्तव्य करणं चुकीचं आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT