Suraj chavhan, ajit pawar, Anjali Damania Sarkarnama
मुंबई

Anjali Damania : अंजली दमानियांनी का उचललं अजितदादांच्या सहकाऱ्याविरोधात पाऊल?

Anjali Damania Vs Suraj chavhan Ajit Pawar NCP : "अजित पवार गटाचे अधिकृत प्रवक्ते सुरज चव्हाण यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. त्यांनी जे वाट्टेल ते वक्तव्य केलं ‘सुपारीबाज बाई’, ‘रिचार्जवर चालणारी बाई’, कोणी अग्रवाल वकिलांकडून पैसे घेतले..."

Jagdish Patil

Mumbai News, 27 August : मागील काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुरज चव्हाण यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला होता. अंजली दमानिया या त्यांच्या कुटुंबाबरोबर परदेशात फिरायला गेल्या होत्या.

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील पदाधिकारी सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी 'पाच वर्षात कष्टाच्या पैश्याने किती परदेश दौरे केले ते जनतेला दाखवा.' असं ट्विट करत दमानिया यांना डिवचलं होतं.

शिवाय यावेळी त्यांनी रिचार्जवर चालणारी बाई, असा दमानिया यांचा उल्लेख केला होता. मात्र, दमानिया यांच्यावर या भाषेत टीका करणं आता चव्हाण यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण, अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सुरज चव्हाण यांना थेट मानहानीची नोटीस बजावली आहे. याबाबतची माहिती त्यांनी एक्सवर एक पोस्ट करत दिली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, "राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाला व त्यांच्या अधिकृत प्रवक्ते सुरज चव्हाण यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. त्यांनी जे वाट्टेल ते वक्तव्य केलं ‘सुपारीबाज बाई’, ‘रिचार्जवर चालणारी बाई’, कोणी अग्रवाल वकिलांकडून पैसे घेतले, त्यांच्या मुलांचा, नवऱ्याचा सगळा डिटेल्स देणार, त्या ब्लॅकमेलर आहेत का?

असे विचारल्यावर, ‘100 टक्के’, हे जे जे अतिशय गंभीर, बेछूट, गलिच्छ आणि खालच्या दर्ज्याचे आरोप एका सुसंस्कृत, सिध्दांतवादी व्यक्तीबद्दल केलेत याची अद्दल तुम्हाला भोगावी लागेल. मी आता शेवटपर्यंत कायदेशीर कारवाई करणार आहे," असा इशाराच त्यांनी दिला आहे. दमानिया यांनी या पोस्टमध्ये नोटीस बजावल्याचे फोटो देखील जोडले आहेत. त्यामुळे आता दमानिया यांच्या परदेश दौऱ्यावर केलेली टीका सुरज चव्हाण अंगलट येण्याची शक्यता आहे.

नेमका वाद काय?

अंजली दमानिया या त्यांच्या कुटुंबाबरोबर परदेशात फिरायला गेल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते सुरज चव्हाण यांनी 'पाच वर्षात कष्टाच्या पैश्याने किती परदेश दौरे केले ते जनतेला दाखवा.' रिचार्जवाल्या ताईच्या कारनाम्याचे पुस्तक बनेल, एक एक अध्याय महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणार, असं ट्विट करत त्यांनी दमानिया यांच्यावर टीका केली होती.

तर दमानिया भारतात परतल्यानंतर त्यांनी 'मी सर्व आरोपांना उत्तर देईन आणि काहींना धडा शिकवेण' असा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांची पत्रकार परिषदेत घेत चव्हाण यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. अशातच आता अंजली दमानिया यांनी थेट मानहानीची नोटीसच सुरज चव्हाण यांना बजावली आहे. त्यामुळे अजित पवार गट या नोटीसवर काय बोलणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT