Rohit Pawar : 'हा तर निचपणाचा कळस,' रोहित पवार शिंदे सरकारवर भडकले; अधिवेशन बोलवण्याची केली मागणी

Rohit Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Statue : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे.
Rohit Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Rohit Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : मालवण येथे आठ महिन्यापूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असून विविध संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. राजकीय वातावरण तापला असून विरोधी पक्षाकडून सरकार वर निशाणा साधण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurga District) राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 35 फूट उंच पुतळा सोसाट्याच्या वाऱ्यात सोमवारच्या सकाळी अचानक कोसळला. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आठ महिन्यापूर्वी 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त करण्यात आले होते. महाविकास आघाडीने या घटनेवरून राज्य सरकारला धारेवर धरत पुतळा कोसळल्याच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Rohit Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Statue Shivaji Maharaj: चौकशीसाठी फक्त दोन दिवस खूप, एसआयटी-फिसायटीची गरजच नाही; सत्यजीत तांबे संतापले

याबाबत सोशल मीडिया वरती पोस्ट करत रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, टेंडरबाज, दलालीखोर सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातही दलाली खाण्याचे कृत्य म्हणजे निचपणाचा कळस आहे. प्रत्येक कामाच्या अंदाजपत्रकात 10 % वाढ आणि नंतर वाढीव दराने टेंडर भरून 25% वाढ करायची नंतर कंत्राटदाराकडून दलाली खायची असा नवा #गोरखधंदा या सरकारने सुरु केला असून 50,000 कोटीची दलालीची प्रकरणे मी स्वतः बाहेर काढली आहेत.

'एकीकडे कामांची बिले निघत नाहीत म्हणून विकासकामे थांबली आहेत, तर दुसरीकडे तिजोरी खाली असल्याने अनेक योजनांना तसेच भरती प्रक्रियांनाही स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र दलालीच्या दलदलीत अडकला असून राज्य आर्थिक दिवाळ खोरीच्या मार्गावर येऊन ठेपलंय. या दलालीच्या दलदलीला घाबरून गुंतवणूकदारांनीही राज्याकडं पाठ फिरवलीय'.

Rohit Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Raj Thackeray News : राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप, म्हणाले...

महाराष्ट्राची अधोगतीकडे होत असलेली वाटचाल रोखणं गरजेचं असून त्यासाठी राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी सरकारने त्वरित दोन दिवसीय अधिवेशन बोलवून चर्चा करायला हवी, अन्यथा दिवाळखोरीच्या गर्तेत अडकत चाललेला महाराष्ट्र बाहेर काढणं खूप कठीण होऊन बसेल अस रोहित पवार म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com