Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Rashtrawadi News: अजित पवार गटाला मिळणार आणखी तीन मंत्रिपदं; शिंदे गटाला मिळणाऱ्या खात्यांना कात्री ?

Maharashtra NCP Crisis : अजित पवार यांच्या गटाला युती सरकारमध्ये 12 मंत्री पदे देण्यात येणार आहेत,

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी फूट पडून नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या मंत्र्यांकडे कोणते खाते देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या गटाला युती सरकारमध्ये 12 मंत्री पदे देण्यात येणार आहेत, त्यापैकी नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली असून आज (सोमवारी) सायंकाळपर्यंत खातेवाटप होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 इतकी आमदारांची संख्या आहे, त्यापैकी 15 टक्के आमदारांना मंत्री म्हणून शपथ देता येते, त्यामुळे 43 आमदारांना युती सरकारमध्ये शपथ देण्यात येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत भाजपच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दहा मंत्र्यांनी शपथ घेतली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देखील दहा मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. रविवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यात अजित पवार यांच्या सोबत आलेल्या गटातील नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.

महाराष्ट्र सरकारमध्ये सध्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह 29 मंत्री आहे. सध्या शिंदे फडणवीस सरकार स्थापन होण्यापूर्वी करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या वाटणी आता बदलली आहे, शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांची एन्ट्री झाल्याने शिंदे गटाचे मंत्रीपद देखील कमी झाले आहे. आता भाजपला 17 शिवसेना शिंदे गटाला 14 आणि अजित पवार यांच्या गटाला बारा मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे शिंदे गटात मंत्री पदाची आशा बाळगणाऱ्या अनेक आमदारांना मंत्रीपदापासून दूर राहावं लागणार आहे.

या मंत्र्यांना संध्याकाळपर्यंत खाती दिली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याची यादी समोर आली आहे. अजित पवार यांच्या गटाला 12 खाते दिली जाणार आहेत. यातील काही महत्त्वाची खाती अजित पवार गटाच्या वाट्याला आली आहेत. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अजित पवार यांनी रविवारी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मात्र, आमदारांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे कोणतं पद जाणार ? अजित पवार यांना कोणतं खातं मिळणार ? अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना भाजपकडील खाते मिळणार की शिंदे गटाच्या खात्यांनाही कात्री बसणार ? अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर आता अजित पवार यांच्या गटाला कोणती खाती मिळणार याची एक संभाव्य यादी समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खाती वाटपाची चर्चा सुरू आहे. चांगली आणि अधिकाधिक खाती आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या खात्यांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या गटाला अर्थ किंवा महसूल, जलसंपदा, महिला आणि बाल विकास, क्रीडा आणि युवक कल्याण, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय, मासेमारी वस्त्र मंत्रालय, मागास आणि बहुजन कल्याण, वाहतूक, गृहनिर्माण, अल्पसंख्याक, वक्फ, सामाजिक न्याय आपत्ती व्यवस्थापन आणि पशुसंवर्धन ही 12 खाती देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या खाते वाटपाची माहिती आज संध्याकाळपर्यंत येईल आणि उद्या सर्वच नऊ मंत्री पदभार स्वीकारतील असं सूत्रांनी सांगितलं.

अजित पवार गटाकडे जाणारी मंत्रीपदे संभाव्य यादी

  • अर्थ किंवा महसूल

  • जलसंपदा

  • महिला आणि बाल विकास

  • क्रीडा आणि युवक कल्याण

  • अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय

  • मासेमारी, वस्त्र मंत्रालय

  • मागास आणि बहुजन कल्याण

  • वाहतूक

  • गृहनिर्माण

  • अल्पसंख्याक आणि वक्फ

  • सामाजिक न्याय आणि आपत्ती व्यवस्थापन

  • पशुसंवर्धन

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT