NCP Crisis : राष्ट्रवादीकडून कारवाईस प्रारंभ ; अजितदादांच्या शपथविधीला उपस्थित असलेल्या बड्या नेत्याची हकालपट्टी

Maharashtra NCP Crisis : शपथविधीला उपस्थित राहणाऱ्या आणखी कुणावर कारवाई होणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
Jayant Patil, Ajit Pawar News
Jayant Patil, Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर कारवाईचे संकेत काल (रविवारी) राष्ट्रवादीने दिले होते. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कारवाईस प्रारंभ केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या शपथविधीसाठी राजभवनात उपस्थित असलेले पक्षाचे सदस्य आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांना पदावरुन बडतर्फ करण्यात आले आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या टि्वट हॅडलवरुन गर्जे यांना बडतर्फ करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. या कारवाईनंतर अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित राहणाऱ्या आणखी कुणावर कारवाई होणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

"महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी शिवाजीराव गर्जे उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून व पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे," असे जयंत पाटलांनी पत्रात म्हटलं आहे.

Jayant Patil, Ajit Pawar News
Rahul Narvekar On 9 MLAs Petition : राष्ट्रवादीतील नऊ आमदारांच्या अपात्रतेवर राहुल नार्वेकर म्हणाले..

शरद पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी वर्णी लावली. त्यानंतर अजित पवार यांनी आज (सोमवारी) मंत्री अनिल पाटील यांची प्रतोदपदी निवड केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि अनिल पाटील असे दोन प्रतोद झाल्याने व्हिप कुणाचा लागू होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट शक्तिप्रदर्शन करणार आहेत. अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांनी 5 जुलै बैठक बोलावली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com