Praful Patel News : २०२२ ला महाविकास आघाडीची सत्ता सरकार कोसळणार हे निश्चित झालं, जेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी गुवाहाटीला गोवा करत पर्यटनासाठी गेले होते. तेव्हा राष्ट्रवादीचे आमदार, विधान परिषद सदस्य शरद पवारांना भेटले होते. आपण भाजपासोबत सत्तेत जाऊ अशी विनंती करत होते. अजित पवारांनी पक्षाच्या, कार्यकर्त्यांच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेतला आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
प्रफुल्ल पटेल म्हणाले मी एक सौम्य व्यक्ती आहे म्हणून कमी बोलतो. मी पुस्तक लिहिण्याची वेळ येणार आहे. तेव्हा महाराष्ट्राला काय काय समजेल ते मी आता सांगणार नाही. मी म्हणजे पवार साहेबांची सावली. पुढे बोलतांना पटेल म्हणाले, प्रफुल्ल या मंचावर कशासाठी असा प्रश्न तुम्हाला पडेल, त्यांच्या मंचावर का नाही याचे उत्तर देशच नाही तर महाराष्ट्र शोधत आहे. हा प्रफुल्ल पटेल पुस्तक लिहिल तेव्हा महाराष्ट्राला धक्का बसेल, तेव्हा महाराष्ट्राला काय काय समजेल हे मला सांगण्याची गरज नाही.
प्रफुल्ल पटेल म्हणजे त्यांची सावली होती, नेहमी त्यांच्यासोबत असायचो. कधी विरोधात पाहिलेय का? पण मी आज या मंचावर उभा आहे. अजूनही वेळ गेली नाही. मी जाहीरपणे विनंती करतो,आमची भावना समजून घ्या. आमच्या देवाने आमची भावना समजावी आम्हांला पण आशीर्वाद द्यावा. तुमच्या आशिर्वादाने आम्ही सगळे याच दिशेने काम करू, असे आवाहन पटेल यांनी शरद पवारांना केले आहे.
कोणी म्हणतात वैचारिक मतभेद आहेत. ज्या दिवशी महाविकास आघाडी बनली तेव्हा शिवसेना कोणासोबत होती, भाजपासोबत. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांना सर्वाधिक शिव्या दिल्या असतील त्या बाळासाहेबांनी दिल्या. मग भाजपासोबत गेलो तर काय वाईट. काश्मीरच्या मेहबुबा मुफ्ती, फारुक अब्दुल्ला हे भाजपासोबत जाऊ शकतात. स्टॅलिन एनडीएचे भागीदार होते.
मी विरोधकांच्या पाटणातील मिटिंगमध्ये गेलो होते. ते चित्र जेव्हा मी पाहिले तेव्हा मला हसू येत होते. एका पक्षाचे खासदार शून्य होते.तर एका पक्षाचा खासदारच नाही. तर अशा १७ पक्षांसोबत जाऊन काय होणार आहे. आम्ही पक्षाच्या, मतदारसंघांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे, असे पटेल म्हणाले. अजित पवारांना काय गरज होती. ते विरोधी पक्षनेते होते. त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आपण त्यांना शेवटपर्यंत साथ देऊ, त्यांचे काही चुकत असेल तर त्यांना सांगू महाराष्ट्राच्या हितामध्ये हे बसणार नाही, असे पटेल यावेळी म्हणाले.
Edited by : Rashmi Mane