Rahul Narvekar-MLA Disqualification Sarkarnama
मुंबई

Rahul Narvekar-MLA Disqualification : राष्ट्रवादीची आमदारांना अपात्रत करण्याची मागणी; राहुल नार्वेकर म्हणाले...

Maharashtra Politics : अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. अजित पवार यांनी उपमुख्यंमत्री पदाची शपथ घेतली.

अनुराधा धावडे

Rahul Narvekar on NCP MLA Disqualification : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. अजित पवार यांनी उपमुख्यंमत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतर आठ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सादर केली आहे.

यावर, जयंत पाटील यांनी दाखल केलेली याचिका मला मिळाली. त्या याचिकेतील मुद्दे वाचून पुढील निर्णय घेऊ, असल्याचे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या आपत्रेची याचिका प्रलंबित असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) या नऊ आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्ष का निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी नार्वेकर म्हणाले, " विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेता निवडण्याचा अधिकार आहे. हा अधिकार बजावताना विधानसभा अध्यक्षांना सैंविधानिक तरतुदी आणि विधानसभेच्या नियमांचे पालन करूनच निर्णय घेतला जाईल. (Maharashtra Politics)

जयंत पाटील यांनी 9 आमदारांविरूद्ध अपात्रतेची याचिका सादर केली आहे. ती मला प्राप्त झाली आहे. ती वाचून योग्य निर्णय घेईन. याचिकेचे वाचन केल्याशिवाय अपात्रतेबाबत काही सांगू शकत नाही असे विधान नार्वेकर यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस मधील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पदाचा राजीनामा देऊन राज्यातील भाजप शिवसेना शिंदे गटाच्या युती सरकारमध्ये सामील झाले आहे रविवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबत गेलेल्या छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अमोल पाटील, धर्मरामबाबा आश्रम, आदिती तटकरे, संजय सिरसाट आणि हसन मुश्रीफ या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या आमदारांविरोधात जयंत पाटील यांनी अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT