Mahavikas Aaghadi & Nana Patole  Sarkarnama
मुंबई

Nana Patole News: पटोलेंवरुन आघाडीत बिघाडी? राष्ट्रवादीनेही आळवला नाराजीचा सूर; हायकमांड काय निर्णय घेणार?

Mahavikas Aaghadi & Nana Patole : महाविकास आघाडीच्या पहिल्याच सभेला नाना पटोले गैरहजर राहिल्याने चर्चा...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर येथील वज्रमूठ सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गैरहजर राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पटोले आजारी असल्यानं सभेला येऊ शकले नाहीत अशी सारवासारव केली. पण त्यानंतर पटोलेंनी आपण सभेदिवशी ठणठणीत होतो, पण काही कामानिमित्त दिल्लीला जावे लागले असं विधान करत राऊतांनाच तोंडघशी पाडलं.

हे प्रकरण मिटत नाही तोच काँग्रेसच्या आशिष देशमुखांनी पटोलेंवर गंभीर आरोप केले. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही छत्रपती संभाजीनगर येथील आघाडीच्या सभेला गैरहजर राहिल्यानं पटोलेंविरोधात तीव्र नाराजी असल्याचं समोर आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस(Ncp News) ची मुंबई येथे मंगळवारी(दि.४) बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे. पटोले यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीमध्ये आक्षेप असून महाविकास आघाडीच्या पहिल्याच सभेला नाना पटोले गैरहजर राहिल्याने चर्चा झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका, विधानसभा, लोकसभा निवडणुका त्यातील जागा वाटपाबाबत काँग्रेसमध्ये पटोले यांच्याबरोबर समन्वय होत नसल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी मांडल्यांचं सूत्रांनी सांगितलं आहे. तसेच यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात समन्वय ठेवतात असल्याचंही सांगण्यात आलं.

शरद पवार काय म्हणाले ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी काँग्रेसबाबत निर्णय दिल्ली पातळीवर होत असतात, त्याला उशीर होईल. तोपर्यंत ठाकरेंबरोबर चर्चा करण्याच्या सूचना दिल्या. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक कशा लढणार याबाबत ठाकरे काय भूमिका हे जाणून घ्या.पक्षातील इतर नेत्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही पवार यांनी नेत्यांना दिल्या.

पटोलेंबाबत हायकमांड काय निर्णय घेणार?

नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. तांबे-थोरात आणि पटोले यांच्यातील वादाचे पडसाद थेट दिल्ली दरबारी हायकमांडपर्यंत पोहचले होते.यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांच्याविरोधात काँग्रेसमधील असंतुष्ट गट दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटला होता. यावेळी पटोले कार्यशैलीवर आक्षेप नोंदविला होता.

आता महाविकास आघाडीतील घटक पक्षातही पटोलेंबाबत फार काही चांगलं मत नसल्याचंही बोललं जात आहे. आता आशिष देशमुख यांनीही पटोलेंवर गंभीर आरोप केल्यानं पटोलेंबाबत काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार का याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे.

(Edited by Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT