Jayant Patil Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics: राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा नाही; जयंत पाटलांनी पक्षाची भूमिका केली जाहीर

Jayant Patil News : दिशाभूल करुन आमदारांच्या सह्या घेतल्या गेल्या; जयंत पाटील यांचा मोठा दावा

सरकारनामा ब्यूरो

NCP News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह अजून काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील संवाद साधला आहे.

यावेळी शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही, अशी थेट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. जयंत पाटील म्हणाले, "सत्तेत असणाऱ्या पक्षाने पुन्हा एकदा आणखी एक पक्ष फोडण्याच काम केलं आहे. वाटेल त्या पद्धतीने सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. मात्र, जनता शरद पवार यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिल. याचा आम्हाला विश्वास आहे", असं ते म्हणाले.

राष्ट्रवादीतून बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झालेले अजित पवारांसह अजून काही नेते यांच्याबाबतीत पक्ष काही कारवाई करणार का? या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, "आम्ही कारवाईच्या बाबातीत अजून अभ्यास केलेला नाही. मात्र, आम्ही योग्य ती पाऊलं टाकणार आहोत. ज्या सहकाऱ्यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनीच राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधी जावून भूमिका घेतलेली आहे. पण मी बाकीच्या आमदारांना दोष देणार नाही", असं म्हणत जयंत पाटलांनी एक प्रकारे बंड करणाऱ्यांना इशारा दिला.

"बंड केलेल्यांपैकी बऱ्याच जणांचा आम्हाला फोन आला आहे. काही आमदारांच्या सह्या का घेतल्या, हे त्या आमदारांनाही माहिती नाही. पण ज्या नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांची शपथ ही पक्षाच्या धोरणाविरोधी आहे. तसेच आमदारांकडून ज्या सह्या घेतल्या त्या कशावर घेतल्या ते आमदारांना माहित नाही, असं आम्हाला काही आमदार सांगत आहेत.

त्यामुळे त्याविषयी सविस्तर भूमिका समोर आल्यानंतर आम्ही यावर सविस्तरपणे बोलू. ज्या नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. ती पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात आहे. तसेच ज्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांना मोठी आश्वासनं देण्यात आलेली आहेत", असं जयंत पाटील म्हणाले.

यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाबाबत केलेल्या विधानावर जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, "अजित पवार काय म्हणाले याबाबत मी पत्रकार परिषद घेतलेली नाही. तर राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहिल यासाठी मी पत्रकार परिषद घेतली आहे. जितेंद्र आव्हाड यांची विरोधीपक्षनेते म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत 5 जुलैला शरद पवार सविस्तर भूमिका मांडतील. राष्ट्रवादी पक्षाचा शिंदे-भाजपला पाठिंबा नाही. पाठिंबा नसतानाही काही सहकाऱ्यांनी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला, त्यामुळे कायदेशीर काही अडचणी आल्या तर त्यांना त्याला तोंड द्यावे लागेल", असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT