NCP News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या बारा आमदारांना पक्ष विरोधी कारवाई केली म्हणून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उत्तर देण्यासाठी या आमदारांना ४८ तासांचा कालावधी देण्यात आलेला आहे. आता अजित पवार गटाकडून याला काय उत्तर दिले जाते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. (NCP issued show cause notice to 12 MLAs who accompanied Ajit Dada)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) गटाने पाच जुलै रोजी आमदारांची बैठक बोलावली होती. त्याच वेळी अजित पवारांनीही (Ajit Pawar) बैठक बोलावली हेाती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांनी अजित पवारांच्या बैठकीला हजेरी लावली होती. अवघ्या १३ ते १४ आमदारांनी शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थिती लावली होती, त्यामुळे ५ जुलै रोजच्या पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहून पक्षविरोधी कारवाई केली म्हणून ही कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे.
कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या १२ आमदारांना उत्तर देण्यासाठी ४८ तासांचा अवधी देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाचे हे आमदार काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. तसेच, अजित पवार गटही शरद पवार यांच्या गटातील आमदारांना कारणे दाखवा नोटीस देणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कारण शिवसेना फुटीनंतर तसा प्रकार घडलेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने या बारा आमदारांना बजावली कारणे दाखवा नोटीस
आमदार सुनील शेळके, दिलीप बनकर, नितीन पवार, दीपक चव्हाण, इंद्रनील नाईक, यशवंत माने, शेखर निकम, राजू कारेमोरे, मनोहर चंद्रकपुरे, संग्राम जगताप, राजेश पाटील, माणिकराव कोकाटे आदी आमदारांचा यामध्ये समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.