Cabinet Expansion : मुख्यमंत्र्यांनी भाजप हायकमांडचा 'तो' आदेश अर्धा पाळला; त्या पाचपैकी दोन मंत्र्यांची खाती बदलली

त्या पाच जणांची खुर्ची वाचली आहे. पण, त्यातील दोघांची मंत्रिपदे बदलण्यात आली आहेत.
Eknath Shinde-Abdul Sattar-Sanjay Rathod
Eknath Shinde-Abdul Sattar-Sanjay RathodSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politic's : मंत्रिमंडळ विस्तारावेळी पाच मंत्र्यांना वगळण्याची सूचना भाजप हायकमांडने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जूनच्या पहिल्या आठवड्यात दिली होती. त्या पाच जणांची खुर्ची वाचली आहे. पण, त्यातील दोघांची मंत्रिपदे बदलण्यात आली आहेत. वाद्‌ग्रस्त ठरलेले अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी, तर संजय राठोड यांच्याकडून अन्न व औषध प्रशासन खाते काढून घेण्यात आले आहे, त्यामुळे खातेवाटपात नाही म्हटलं तर शिंदे गटाला धक्का बसल्याचे मानले जात आहे. तसेच, भाजप हायकमांडने दिलेला अर्धा आदेश शिंदे यांनी पाळल्याचे दिसून येते. (Chief Minister Eknath Shinde half followed order of the BJP High Command)

राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) हे शिवसेना-भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदार मंत्री झाले आहेत. त्यांना आज खात्यांचे वाटप करण्यात आले. त्यात शिंदे गटातील दोन मंत्र्यांची खाती काढून घेऊन ती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहेत.

Eknath Shinde-Abdul Sattar-Sanjay Rathod
BJP HighCommand suggestion to shinde : मंत्रिमंडळ विस्तारावेळी ‘त्या’ पाच मंत्र्यांना वगळा;भाजप हायकमांडच्या सूचनेने मुख्यमंत्री पेचात

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडून कृषिमंत्रीपद काढून त्यांना अल्पसंख्याक विकास आणि औकाफ, पणन हे खाते देण्यात आले आहे. भाजपच्या एक यंत्रणेकडून देण्यात आलेल्या अहवालामध्ये ‘केंद्रीय योजनांचा लाभ कृषीमंत्री सत्तार हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकलेले नाहीत, त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे,’ असे निरीक्षण सत्तार यांच्याबाबत नोंदविण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांना बदलण्याची सूचना भाजप हायकमांडने केली होती.

Eknath Shinde-Abdul Sattar-Sanjay Rathod
Dhananjay Munde News : दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या धनंजय मुंडेंनी मिळवलं वजनदार खातं!

संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याकडील महत्वाचे असलेले अन्न व औषध प्रशासन खातं काढून त्यांना मृद्‌ व जलसंधारण विभाग देण्यात आलेला आहे. संजय राठोड यांच्याबाबत भाजप समर्थक औषध विक्रेत्यांच्या तक्रारी वरिष्ठ नेत्यांपर्यंत गेल्या होत्या. तसेच, पूजा चव्हाण प्रकरणातील नावामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होण्याचा धोका आहे, असेही राठोड यांच्याबाबत म्हटलेले होते.

दरम्यान, अतुल सावे यांच्याकडील सहकारमंत्रीपद काढून ते दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आलेले आहे. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्याकडील अर्थ व नियोजन, तर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचे अत्यंत आवडते वैद्यकीय शिक्षण हे खातेही भाजपला सोडावे लागले आहे. त्यामुळे अजित पवार गटाला शिवसेना-भाजपकडील महत्वाची खाती मिळाली आहेत.

Eknath Shinde-Abdul Sattar-Sanjay Rathod
Solapur News : प्रशांत परिचारकांवर भाजपकडून आणखी एक महत्वपूर्ण जबाबदारी; पृथ्वीराज जाचकांनाही ताकद...

राज्याचे नवे मंत्रीमंडळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार

उपमुख्यमंत्री अजित पवार : वित्त व नियोजन

Eknath Shinde-Abdul Sattar-Sanjay Rathod
Sharad Pawar Letter to CM, DCM: शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांसह अजितदादांना पत्र...

इतर मंत्री आणि त्यांची खाती

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

दिलीपराव वळसे-पाटील – सहकार

राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास

सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य

चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

विजयकुमार गावित- आदिवासी विकास

गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

दादाजी भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

संजय राठोड- मृद व जलसंधारण

धनंजय मुंडे - कृषि

सुरेशभाऊखाडे- कामगार

संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

Eknath Shinde-Abdul Sattar-Sanjay Rathod
Dhananjay Munde News: मला दोन मतांची गरज होती, त्यावेळी अजितदादांनी मदत केली अन्‌ मी आमदार झालो; धनंजय मुंडेंनी सांगितला किस्सा

उदय सामंत- उद्योग

प्रा. तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),

अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन

दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा

धर्मरावबाबा आत्राम – अन्न व औषध प्रशासन

अतुल सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

अदिती तटकरे– महिला व बालविकास

संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता

अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com