Ajit Pawar News Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : अजितदादांनी स्पष्ट केली भूमिका; मुंबईतील आमदारांच्या बैठकीवरुन म्हणाले...

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सरकारनामा ब्यूरो

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. तसेच आज अजित पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले होते. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा विविध चर्चा रंगल्या होत्या.

त्यावरुन स्वत: अजित पवार यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे. पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की ''खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना व उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी 'एमजीएम' हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो.''

''सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी.'' असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी 'जिथे दादा तिथे मी' असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळातून अश्चर्य व्यक्त केले जात आहे. "राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह राज्यातील सर्वांना माहिती आहे की मी अजितदादांचा कट्टर समर्थक आहे. ते उद्या जो निर्णय घेतील तो मला आजच मान्य आहे. दादा जातील तिकडे जाणार. शेवटपर्यंत मी त्यांच्यासोबत राहणार आहे." असे बनसोडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे चर्चा होत आहे.

"अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचा साक्षीदार असल्याचे समाधान आणि अजित पवारांना साथ दिली याचा आनंद आहे. तो शपथविधी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी होता, हे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे मी जे केले ते योग्यच होते." असेही बनसोडे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT