Ajit Pawar and Anna Bansode : जिथं अजितदादा तिथं मी; आमदार अण्णा बनसोडेंनी स्पष्टच सांगितलं

NCP and BJP : राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या चर्चेला उधाण
Anna Bansode
Anna BansodeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार काही आमदारांसह भाजपमध्ये दाखल होणार असल्याच दावा केला. पाटील म्हणाले, "अजित पवार (Ajit Pawar) हीच राष्ट्रवादी आहे. त्यामुळे ते जे बोलतील तोच आमदारांचा आकडा त्यांच्यासोबत असेल. अजित पवारांसोबत बरेच आमदार असून कोणतेही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज असते."

दरम्यान, संजय राऊत यांनीही राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव असल्याचे विधान केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडून अजित पवार भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी 'जिथं दादा तिथं मी' असे वक्तव्य केल्याने राजकिय वर्तुळातून अश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Anna Bansode
Central Government : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर; राज्यसभेत भाजप व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

शिंदे-फडणवीस सरकारमधील शिवसेनेच्या १६ आमदारांबाबत उच्च न्यायालयाचा निकाल काही दिवसात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता काही बड्या नेत्यांनी वर्तविली आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी सर्वांच्या लक्षात आहे. त्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार काही आमदारांसह भाजपमधे जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बनसोडे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Anna Bansode
Appasaheb Dharmadhikari's Reaction: घटना माझ्यासाठी क्लेषदायक; आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया

आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह राज्यातील सर्वांना माहिती आहे की मी अजितदादांचा कट्टर समर्थक आहे. ते उद्या जो निर्णय घेतील तो मला आजच मान्य आहे. दादा जातील तिकडे जाणार. शेवटपर्यंत मी त्यांच्यासोबत राहणार आहे." दरम्यान, आमदार बनसोडे यांनी पहाटेच्या शपथविधीचा साक्षीदार असल्याचे समाधान व्यक्त केले होते.

Anna Bansode
Bjp Job Fair News : कराड म्हणाले, केंद्राच्या योजनांचा लाभ घ्या, महारोजगार मेळाव्यातून उद्योजक घडवणार ...

पहाटेच्या शपथविधीवरून आमदार बनसोडे म्हणाले होते की, "अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचा साक्षीदार असल्याचे समाधान आणि अजित पवारांना साथ दिली याचा आनंद आहे. तो शपथविधी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी होता, हे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे मी जे केले ते योग्यच होते."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com