Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar: राष्ट्रवादीतील एक आमदार 'फितूर'; खुद्द अजितदादांनीच सांगितलं...

NCP Anniversary Day: कोणता तरी एक आमदार आतली माहिती बाहेर पुरवतो, नौटंकी सुरु आहे, अशा शब्दात दादांनी संबधीत आमदाराला खडेबोल सुनावले. आपल्याला सोडून गेलेल्या आमदाराला आपल्या गटातील एक आमदार फोन करुन माहिती पुरवतो.

Mangesh Mahale

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष फुटीनंतर काल अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार गटाने आपला 25 वा वर्धापन दिन साजरा (NCP Anniversary Day) केला. अजित पवार (Ajit Pawar) गटाचा मुंबईत वर्धापनदिन कार्यक्रम झाला. यावेळी अजितदादांनी आपल्या गटातील एका आमदारांवर शंका उपस्थित केली, त्यानंतर हा आमदार कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कोणता तरी आमदार आतली माहिती बाहेर पुरवतो, नौटंकी सुरु आहे, अशा शब्दात अजितदादांनी संबधीत आमदाराला खडेबोल सुनावले. आपल्याला सोडून गेलेल्या आमदाराला आपल्या गटातील एक आमदार फोन करुन माहिती पुरवतो, असे ते म्हणाले.

'आता आम्ही असं करणार आहे, तुम्ही सांगायला हरकत नाही,' असे हा आमदार बाहेरच्यांना सांगत असतो, असे अजितदादांनी त्या आमदारांचे नाव न सांगता, त्याला सुनावले. 'आता एनडीएकडे 284 जागा आहेत, थोड्या दिवसांमध्ये अधिवेशनाच्या पूर्वी किंवा नंतर हा आकडा 300च्या पुढे जाईल, असा दावा अजितदादांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना भावूक अजितदादा भावुक झाले. पक्षाच्या वर्धापनदिनीचा आढावा घेताना त्यांनी शरद पवार यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

"राष्ट्रवादीची स्थापना होत असताना सगळ्यांनी कष्ट घेतले. आर.आर. आबा, बेंडके सर अशा अनेकांचे योगदान होतं. गेली 24 वर्षे शरद पवारांनी पक्षाचं नेतृत्व केलं, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. कारण पक्ष स्थापनेवेळी सोनिया गांधी यांचा परदेशी मुद्दा काढला, मात्र त्यावेळी आपल्याला निवडणुकीत कमी वेळ मिळाला. ⁠सर्वांनी प्रयत्न केला त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो," असे अजित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT