Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Chhagan Bhujbal On Pawar: शरद पवारांनी आम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की...; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी

सरकारनामा ब्यूरो

Political News: शिंदे-फडणवीस सरकारला वर्षपूर्ती होऊन काही तास उलटत नाही तोच राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत अजित पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी छगन भुजबळ यांनीही मंत्री पदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत मोठं विधान केलं आहे.

भुजबळ म्हणाले, "अजित पवार यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. राज्य सरकारचा तिसरा घटक म्हणून आम्ही सहभागी झालोत. आम्ही राष्ट्रवादी पक्ष सोडलेला नाही. राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत", असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे.

"मागील काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरु होत्या. त्याबद्दल मी सविस्तर बोलणार नाही. पण जर राज्यातील शेतकरी, बेरोजगार यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर भांडून चालणार नाही. सकारात्मकपणे काम करावं लागेल," असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.

पुढे भुजबळ म्हणाले, "विरोधी पक्षांची पाटण्यात बैठक झाली. मात्र, त्या बैठकीत काही समन्वय नसल्याचं समोर आलं. खरं सांगायचं झालं तर शरद पवार यांनी आम्हाला काही दिवसांपूर्वीच असं सागंतिलं होतं की, 2024 मध्येही पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच येणार आहेत. मग जर असं असेल तर आपण सकारात्मक विचार घेत आज सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे."

"जनतेचे प्रश्न सोडवण्यास सरकारला मदत केली पाहिजे. रस्त्यावर भांडून प्रश्न सुटणार नाहीत. तर सरकारमध्ये राहून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच आमच्यावर केसेसे आहेत म्हणून आम्ही पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात यतोय तो आरोप चुकीचा आहे", असं मोठं विधान यावेळी भुजबळ यांनी केलं.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT