Maharashtra Politics: मोठी बातमी! राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती

Jitendra Awhad News: राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Political News: अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या अजून काही नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अजून काही जणांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला.

या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व घडामोडींवर भाष्य केलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Jitendra Awhad
Sharad Pawar News : शरद पवारांचा प्रफुल्ल पटेल अन् सुनील तटकरेंना इशारा; त्यांनी स्वत:हून कार्यवाही करावी अन्यथा...

तसेच राष्ट्रवादीच्या पक्षप्रतोदपदी देखील जितेंद्र आव्हाड यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती झाल्याची माहिती खुद्द जितेंद्र आव्हाड यांचीच पत्रकार परिषद घेत दिली आहे.

तर या सर्व घडामोडींवर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. "राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सहकारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले आहेत. याचे सर्व श्रेय हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातं", अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com