Hasan Mushrif Sarkarnama
मुंबई

Hasan Mushrif News: राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ पुन्हा ED च्या रडारवर ; चौकशीसाठी उद्या..

Hasan Mushrif ED Summons: आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करीत ईडीने त्यांची चौकशी सुरू केली आहे.

सरकारनामा ब्युरो

Hasan Mushrif ED Summons: राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना पुन्हा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) (ed summons) समन्स बजावले आहे. त्यांना उद्या (शुक्रवारी) ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

काही दिवसापूर्वी हसन मुश्रीफ यांची ईडीने तब्बल आठ तास चौकशी केली होती. आता त्यांना पुन्हा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.

आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी सुरु आहे. काही दिवसापूर्वी मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीने छापा मारला होता. तेव्हा ते अधिवेशनात होते.

"ईडीने विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तरं दिलं असून या चौकशीमध्ये आपण त्यांना सहकार्य करत असल्याची प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली होती. "मी काहीही केलं नाही, त्यामुळे घाबरायचं कारण नाही,आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करीत ईडीने त्यांची चौकशी सुरू केली आहे.

ईडीकडून गेल्या दोन महिन्यात मुश्रीफ यांच्या संपत्तीवर तीन वेळा छापेमारी करण्यात आली आहे. त्यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता.

मागील सहा ते सात महिन्यांपासून त्यांच्यावर तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. "आपल्याला ईडी प्रकरणांमध्ये अडकवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न होत आहे," असा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. आपल्याविरोधातील कारवाई सुरू ठेवण्याच्या उद्देशाने कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करून त्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहाराच्या गंभीर प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न ईडीकडून केला जात आहे. राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्यासाठी हा सगळा घाट घातला जात असल्याचा दावाही मुश्रीफ यांनी याचिकेद्वारे केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT