Uddhav Thackeray - Fadnavis Meet: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सध्या शेवटचा आठवडा सुरु आहे. आज (गुरुवारी) सभागृहाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी विधीमंडळाच्या आवारात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Devndra Fadnavis)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Uddhva Thackeray) यांनी एकत्र प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
फडणवीस-उद्धव ठाकरेंची झालेली एकत्र एन्ट्री माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपली. दोन्ही नेते संवाद साधत, स्मित हास्य करीत सभागृहात पोहचले. फडणवीस आणि ठाकरे हे उघडपणे चर्चा करताना दिसल्याने अनेकांना आश्चर्य व्यक्त केले आहे.
"किती दिवसात नाही भेटलो एकमेकांस तिऱ्हाईत भासलो.. खोटेचं तरीही सराईत हासलो..." असेच वर्णन या भेटीचं करावं लागेल.
भाजप-शिवसेना पंचवीस वर्षांचा संसार मोडून वेगळे झालेले दोन नेते एकत्र येताना पाहुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. युती तुटल्यानंतर नियमितपणे एकमेकांवर तुटून पडणारे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन परिसरात एकत्र एन्ट्री घेतली. या दोघांच्या एकत्र येण्याने युतीचा नवा फॉर्म्युला तयार होणार का अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरु झाल्या आहेत.
राज्यात शिवसेनेत फुट पडल्यानंतर प्रथमच फडणवीस-ठाकरे एकत्र दिसले. हे दोन्ही नेते एकत्र आले का ? अशा चर्चा यावेळी रंगल्या. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे इतर आमदार उपस्थित होते.
यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "पूर्वी खुलेपणा होता. आता बंद दाराआड चर्चा ही अधिक फलदायी होते असं म्हणतात. आता भविष्यात आमची बंद दाराआड चर्चा झाली तर तेव्हा बोलू. आम्ही दोघे एकत्र प्रवेशद्वारातून प्रवेश करताना रामराम, हाय हॅलो करतो तसं झालं,"
लंडन येथे भारताबाबत वादग्रस्त विधान करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात संसदेत राडा झाल्यानंतर आता विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले. लोकशाहीविरोधात भाष्य करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी, यासाठी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात सभागृहात खडाजंगी झाली.
राहुल गांधींच्या विरोधकात भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी चोर है म्हणत सभागृहात सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला.सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद सुरु असताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन वेळा सभागृह स्थगित केले.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अपशब्द वापरले. काश्मीरमध्येही त्यांनी वीर सावरकरांचा अपमान केला. यामुळे आम्ही राहुल गांधींची निंदा करतो, असं प्रताप सरनाईक यांनी सभागृहात मांडलं.
सभागृहात प्रश्नोत्तरांचा तास संपल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने सत्ताधाऱ्यांनी त्यांना अनुमोदन केलं. त्यानंतर सभागृहात राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.